Online-Watch
Online-Watch 
मुंबई

पालकांचे विद्यार्थ्यांवर ऑनलाईन लक्ष!

सकाळवृत्तसेवा

पालिका शाळांत सीसी टीव्ही; मोबाईल ॲपवर चित्रीकरण
मुंबई - विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबरोबरच त्यांच्या शैक्षणिक प्रगतीबाबत पालकांना माहिती असावी म्हणून महापालिकेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. पालिका शाळांमध्ये सीसीटीव्ही कॅमरे बसवण्यात येणार असून, त्याचे चित्रीकरण थेट पालकांना त्यांच्या मोबाईलवर पाहता येणार आहे. त्यासाठी मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्याचा विचार प्रशासन करत आहे.

शाळांच्या इमारती आणि परिसरात विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी महापालिका सीसीटीव्ही कॅमेरे बसवत आहेत. त्यांचे चित्रीकरण शाळेतील सुरक्षा रक्षकांच्या कंट्रोल रूममध्ये होते. शाळेतील वर्गांमध्येही सीसीटीव्ही कॅमेरे लावावेत आणि मोबाईल ॲप्लिकेशनवर त्याचे चित्रीकरण थेट पालकांना घर बसल्या पाहता येईल अशी सोय करावी, अशी ठरावाची सूचना काँग्रेसच्या  रुक्‍साना सिद्धिकी यांनी डिसेंबरमध्ये महासभेत मांडली होती. त्यावर प्रशासनाने उत्तर सादर केले आहे. सीसीटीव्हीचे चित्रीकरण पाहता येईल, असे मोबाईल ॲप्लिकेशन भविष्यात तयार करता येईल, असे प्रशासनाने नमूद केले आहे.

शालेय इमारतींच्या परिसरात होणाऱ्या अनुचित घटनांवर लगाम घालण्यासाठी सध्या सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जात आहेत. त्याचबरोबर शाळेच्या सामग्रीच्या सुरक्षेचाही विचार आहे, असेही प्रशासनाने नमूद केले आहे. काही वर्षांपूर्वी शालेय विद्यार्थिनींशी शाळेच्या आवारात अनुचित प्रकार घडल्याचे उघड झाले होते. काही शाळा सुटल्यानंतर तिथे गर्दुल्ल्यांचे अड्डे सुरू असल्याचेही आढळले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video Case : झारखंड काँग्रेसचं एक्स अकाऊंट सस्पेंड; अमित शाह व्हिडीओ प्रकरणात मोठी कारवाई

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 02 मे 2024

IPL 2024, CSK vs PBKS: पंजाब किंग्सने करून दाखवलं, चेन्नईला सलग पाचव्यांदा हरवलं

ग्रीन नोबेलचा मानकरी

Google Error : गुगल डाऊन! जगभरातील युजर्स त्रस्त; अमेरिकेतून 1400 तक्रारी

SCROLL FOR NEXT