मुंबई

करवसुलीसाठी पदाधिकारीही सरसावले

सकाळ वृत्तसेवा



कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ता कर वसुलीबाबतचा आढावा घेण्यासाठी स्थायी समिती सभापती दीपेश म्हात्रे यांनी आज बैठक घेतली. मोठ्या थकबाकीदारांविरोधात पालिकेने कडक भूमिका घेऊन वसुली करावी, असे निर्देश या बैठकीत देण्यात आले.

दरम्यान, पालिकेतील मालमत्ताधारकांना मोबाईलवर संदेशाद्वारे त्यांच्या मालमत्ता कराची माहिती देण्याची योजना आखण्याबाबतही म्हात्रे प्रयत्नशील राहणार आहेत.
कल्याण डोंबिवली पालिकेने मालमत्ता कराच्या वसुलीसाठी यापूर्वीच प्रयत्न सुरू केले आहेत. चालू आर्थिक वर्षात मालमत्ता कराद्वारे 470 कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. आतापर्यंत पालिका प्रशासनाने मालमत्ता कराद्वारे 173 कोटी रुपयांची वसुली केली आहे. पालिका प्रशासनाने आतापर्यंत बाराशे व्यावसायिक गाळे सील केले आहेत.

धनादेश न वटल्याप्रकरणी 130 मालमत्ताधारकांवर कायदेशीर कारवाई केली आहे. मागील अनेक वर्षांपासून मालमत्ता कराची थकबाकी असलेल्या थकबाकीदारांच्या प्रकरणांची तपासणी करून त्यांच्या थकबाकीची कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न स्थायी समिती सभापती करणार आहेत. सर्वाधिक थकबाकी असणाऱ्या 100 थकबाकीदारांच्या नावे वर्तमानपत्रात जाहिरात देण्यात येणार आहे. अनेक प्रकरणे न्यायप्रविष्ट असल्याने कराची वसुली होऊ शकलेली नाही. अशा प्रकरणांमध्ये चर्चेतून तोडगा काढणे शक्‍य आहे का? याची चाचपणी करण्यात येणार आहे.


मोबाईलवर मिळणार कराची माहिती
आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे पालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांना त्यांच्या मोबाईलवर कराची माहिती देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यासाठी मालमत्ताधारकांनी पालिकेकडे आपल्या मोबाईल नंबरची माहिती देणे आवश्‍यक आहे. अशाप्रकारचा डाटा जमा केल्यानंतर मालमत्ता कराच्या आकारणीचे बिल संबंधितांना त्यांच्या मोबाईलवर उपलब्ध करून दिले जाईल.


पालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेता स्थायी समितीची जबाबदारी म्हणून कर वसुलीसाठी काय प्रयत्न करता येतील, यावर चर्चा करणे आवश्‍यक होते. प्रशासनाने सुरू केलेले प्रयत्न आणि लोकप्रतिनिधींचा त्याला मिळणारा पाठिंबा याचा एकत्रित परिणाम कर वसुलीवर सकारात्मक दिसेल अशी अपेक्षा आहे.
दीपेश म्हात्रे, सभापती, स्थायी समिती, कडोंमपा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT