crime sakal
मुंबई

Mumbai crime : चारित्र्याच्या संशयातून पत्नीवर हातोडीने हल्ला करून हत्या; आरोपी पती अटकेत

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : चारित्र्यावर संशयामुळे पतीने पत्नीच्या डोक्यात हातोडी मारून तिची हत्या केल्याचा गंभीर गुन्हा रविवारी रात्री शिवडी परिसरात घडल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी शिवडी पोलिसांनी आरोपी पतीला तत्काळ अटक केली. चारित्र्यावरील संशय व पत्नीशी झालेल्या भांडणातून हत्या असे चौकशीदरम्यान निष्पन्न झाले आहे.

नजराणा खातून शेख असे मृत महिलेचे नाव असून. ती शिवडी येथील कौलाबंदर परिसरात पती अब्दुल सलीम मोहम्मद राहून शेख सोबत वास्तव्यास होती. आरोपी अब्दुल सलीम मोहम्मद राहून शेख हा व्यवसायाने वायरमन आहे. पत्नी नजराणा शेखचे परपुरूषाशी अनैतिक संबंध असल्याचा संशय तिच्या पतीला होता.

त्यावरून दोघांमध्ये नेहमी भांडणे होत होती. त्याचा राग आल्यामुळे आरोपीने पत्नीच्या डोक्यात हातोडीने हल्ला केला. त्यातच नजराणा रक्तबंबाळ अवस्थेत खाली कोसळली. तिला जे.जे. रुग्णालयात नेले असता तेथील डॉक्टरांनी तिची वैद्यकीय तपासणी करून तिला मृत घोषित केले.

घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ आरोपी पती अब्दुल शेखला घटनास्थळावरून अटक केली. याप्रकरणी शिवडी पोलीस ठाण्यात आरोपी शेख विरोधात अंतर्गत हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने गुन्ह्यांत वापरलेली हातोडी पोलिसांनी घटनास्थळावरून जप्त केला आहे.

डोक्याला गंभीर इजा झाल्यामुळे महिलेचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले. जे.जे. रुग्णालयात मृतदेहावर शवविच्छेदन करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी शिवडी पोलीस अधिक तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पहिली भेट पोलीस भरतीत, नंतर एकाच ठिकाणी पोस्टिंग अन् वाढली जवळीक; आता पुण्यातील दोन महिला पोलीस करणार लग्न

Pune Katraj Ghat: कात्रज घाटात भाजपचे प्रचार साहित्य कचऱ्यात; झेंडे, टोप्या आणि मोदींच्या फोटोचे टीशर्ट आढळल्याने खळबळ

Wheat Flour Export: भारतीय गव्हाचे पीठ आता परदेशात जाणार! ४ वर्षांची निर्यातबंदी अखेर हटवली; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय

Marathi News Live Updates : भविष्यात अशी कोणतीही घटना घडणार नाही, याची आपण सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे - शायना एनसी

Phulambri News: आमदार होताच पहिल्याच निवेदनात मोठी मागणी; फुलंब्रीत छत्रपती संभाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारणार?

SCROLL FOR NEXT