महाराष्ट्र पुन्हा नंबर वन! मविआ सरकारवर निशाणा साधताना फडणवीसांच्या पोस्टनं वेधल लक्ष : Maharashtra No1 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Maharashtra Politics political  debate over Aditya Thackeray Devendra Fadnavis statements

Maharashtra No1: महाराष्ट्र पुन्हा नंबर वन! मविआ सरकारवर निशाणा साधताना फडणवीसांच्या पोस्टनं वेधल लक्ष

मुंबई : महाराष्ट्र पुन्हा नंबरवन ठरला असल्याचं ट्विट उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. त्यांच्या या ट्विटनं सर्वाचं लक्ष वेधलं आहे. यामध्ये फडणवीसांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणाही साधला आहे. (Maharashtra is Number one again in FDI Devendra Fadnavis shares post)

फडणवीसांनी ट्विट करताना म्हटलं, होय, पुन्हा एकदा एफडीआयमध्ये महाराष्ट्र नंबर 1! आम्ही सातत्यानं सांगत होतो की, खंडणी, वसुली, भ्रष्टाचाराचा महाविकास आघाडीचा काळ संपवून राज्यात नवं सरकार आलं आहे. आता महाराष्ट्रात गुंतवणुकीचा ओघ वाढणार आणि महाराष्ट्र पुन्हा एकदा नंबर वन होणार. (Latest Marathi News)

डीआयपीपीनं जानेवारी ते मार्च 2023 या कालावधीचा जो अहवाल सादर केला आहे. त्यात पुन्हा एकदा महाराष्ट्र सर्वाधिक एफडीआय (परकीय गुंतवणूक) प्राप्त करणारं राज्य ठरलं आहे. यामध्ये 29 टक्क्यांसह महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असून, कर्नाटक 24 टक्क्यांसह दुसर्‍या तर गुजरात 17 टक्क्यांसह तिसर्‍या क्रमांकावर आहे.