Narendra Mehta
Narendra Mehta sakal media
मुंबई

भाईंदर: महापौर, उपमहापौरांसह माजी आमदारांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

भाईंदर : मिरा-भाईंदरला (Mira-bhayandar) जाणवत असलेल्या पाणीटंचाई (water strike) विरोधात मिरा रोड येथे आंदोलन (Mira road strike) करून कोरोना नियमांचे उल्लंघन (breaks corona rule) केल्याप्रकरणी मिरा-भाईंदरच्या महापौर ज्योत्स्ना हसनाळे(jyotsna hasnale), उपमहापौर हसमुख गेहलोत (Hasmukh Gehlot) आणि माजी आमदार नरेंद्र मेहता (Narendra Mehta) यांच्यासह भाजप नगरसेवक आणि कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

मिरा-भाईंदरला जाणवणाऱ्या पाणीटंचाईविरोधात भाजपने गुरुवारी आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. यात मिरा रोड ते दहिसर चेक नाका पदयात्रा आणि नंतर मुंबईतील एमआयडीसी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन असे हे आंदोलन केले जाणार होते. नागरिकांनाही यात सामील होण्याचे आवाहन भाजपकडून केले होते; मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मिरा-भाईंदर शहरात जमावबंदीचे आदेश लागू आहेत. पाचपेक्षा जास्त व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास मनाई आहे.

आंदोलन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा नोटिसा पोलिसांनी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना बजावल्या होत्या; मात्र त्यानंतरही गुरुवारी सकाळी भाजपचे नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मिरा रोडच्या सिल्वर पार्क भागात जमा झाले होते. या वेळी नेत्यांनी भाषणेही केली. त्यामुळे मनाई आदेशांचे उल्लंघन तसेच कोरोना नियमांचे पालन न केल्याप्रकरणी काशी मिरा पोलिसांनी महापौर ज्योत्स्ना हसनाळे, उपमहापौर हसमुख गेहलोत, माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यासह भाजप नगरसेवक आणि पदाधिकारी अशा ७९ तसेच २५० अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Sanju Samson Wicket Controversy : संजू सॅमसन OUT की NOT OUT? कॅचवरून पेटला वाद; सामन्यादरम्यान मैदानात राडा

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Latest Marathi News Live Update : कर्नाटकात दहावीचा निकाल उद्या जाहीर होणार

SCROLL FOR NEXT