मुंबई

महाराष्ट्रात लॉकडाऊन लागणार का?, लॉकडाऊन संदर्भात उपमुख्यमंत्र्यांचं महत्त्वाचं विधान

पूजा विचारे

मुंबई: नाव्हाशेवा पाणीपुरवठा योजनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या हस्ते भूमिपूजन पार पडले. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, राज्यमंत्री संजय बनसोडे, आदिती तटकरे कार्यक्रमाला उपस्थित होते.  १ तारखेपासून कोरोना वाढला असल्याचं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. 

अजित पवार यांनी केलेल्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे 

  • पिण्याचे पाणी गरजेचे आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलून तोडगा काढू.
  • शहरात लॉकडाऊनची वेळ येणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायची आहे.
  • यवतमाळ, अमरावतीप्रमाणे अनेक ठिकाणी कडक नियम करावे लागले. आजपासून पुण्यात नाईट कर्फ्यू आहे. त्यावर विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांसोबत बोलणार आहे. 
  • काय काळजी घेतली पाहिजे, हे स्वतः राज्याच्या प्रमुखांनी राज्यातल्या जनतेला सांगितलं.
  • आपल्यापुढं काही निर्णय घेण्याची गरज आहे. ते सगळं सांगितलं असलं तरी देखील लोकांना गांभीर्य नाही आहे. त्यामुळे फार कठोर निर्णय घेण्याची वेळ कृपा करुन राज्यावर येऊन देऊ नका. 
  • काही कोटींची योजना ते काही 10 नियोजनालय एवढ्या मोठ्या योजनेचं भूमिपूजन आज राज्याच्या प्रमुख यांच्या हस्ते झालं आहे. 
  • याच वर्षात काम पूर्ण झाले पाहिजे. कुठलीही अडचण न येता कामा नये. त्यांनी अतिशय दर्जेदार अशा प्रकारचं काम केलं पाहिजे. कामाचा दर्जा प्रत्येक टप्प्यावर कसा चांगला राखला जाईल. 
  • प्रकल्पाचं काम संपूर्ण उत्कृष्ट कशा प्रकारचा राहील यात कुठल्याही परिस्थितीत उन्नीस-बीस कामात काही त्रुटी राहता कामा नये. अशा प्रकारची अपेक्षा मी संबंधित अधिकारी व्यक्त करतो. पण त्याकरता महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पूर्णपणे आपली स्वतःची सगळी पणाला लावेल. 
  • महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये या शहरांमध्ये आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलं गाव कुठला परिसर पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहणार नाही. काही शहरी भागांमध्ये स्वतः एकनाथ शिंदे आहेत त्यांची मदत या ठिकाणी घेतली जाईल आणि बाकीच्या बाबतीमध्ये जी मदत लागेल ती केली जाईल.

--------------------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Navasheva water supply scheme ajit pawar important statement on state lockdown

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT