Gold Market
Gold Market sakal media
मुंबई

दसरा सण मोठा, खरेदीला नाही तोटा; सोने बाजारालाही नवी झळाळी

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : नवरात्रोत्सवाची (Navratri festival) नववी माळ आज पूर्ण होणार असून देशभरात विजयादशमी (Vijayadashmi) म्हणजेच दसरा सण (Dussehra festival) साजरा केला जाणार आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसरा सणाच्या निमित्ताने सोने, इलेक्ट्रॉनिक वस्तू, वाहने, वास्तू आदींची खरेदी करण्याकडे ग्राहकांचा (consumers demand) ओढा असतो. तेव्हा दसऱ्याच्या मुहूर्तावर नवनवीन वस्तूंनी सध्या ठाणे शहरातील बाजारपेठा (Thane Market) सजल्या आहेत.

पितृपक्षानंतर नवरात्रीत तेही दसऱ्याच्या मुहूर्तापासून खरेदीला मोठ्या प्रमाणात सुरुवात होते. कोरोना साथ, तसेच टाळेबंदीमुळे गेली पावणेदोन वर्षे बाजारपेठांवर मंदीचे सावट घोंगावत होते. मात्र आता कोरोनाचा संसर्ग आटोक्यात येऊन सर्वांच्या व्यवसाय, उद्योगाची गाडी थोडीफार रुळावर येत आहे. दसऱ्यानिमित्त नव्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी कमी अधिक प्रमाणात ग्राहकही उत्साहित आहेत. दसऱ्याच्या मुहूर्तावर ग्राहकांना खरेदीकडे आकर्षित करण्यासाठी व्यापारी वर्गाने वेगवेगळ्या सवलतींच्या योजनाही देऊ केल्या आहेत.

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंमध्ये अधिकतर लॅपटॉप, मोबाईल, फ्रिज, वातानुकूलित यंत्रणा, टीव्ही आदींच्या खरेदीकडे ग्राहकांचा अधिक कल असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. ठाणे शहरातील अनेक विक्रेते इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीवर ५ ते १० टक्के सूट, लॅपटॉपच्या खरेदीवर मोफत वस्तू, तर फ्रिज अथवा वॉशिंग मशीन खरेदीवर दैनंदिन वापरातील लहान इलेक्ट्रॉनिक वस्तू मोफत अशा योजनांनी ग्राहकांना खरेदीसाठी आकर्षित करीत आहेत.

इलेक्ट्रिक वाहनांना पसंती

इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंसोबतच वाहन खरेदीकडेही ग्राहकांचा यंदा ओढा आहे. इंधन दरवाढ झाली असली तरी दैनंदिन वापरासाठी मागील १० दिवसांपासून दुचाकींच्या बुकिंगमध्ये ३० टक्क्यांची वाढ झाल्याचे शहरातील वाहन व्यावसायिकांनी सांगितले. इंधनावर चालणाऱ्या वाहनांसोबतच यंदा इलेक्ट्रिक वाहनांमध्येही नावीन्य आले असून इलेक्ट्रिक दुचाकी वाहन खरेदीची बुकिंगही सध्या जोरात आहेत.

"दरवर्षीप्रमाणे यंदाही दसऱ्याच्या मुहूर्तावर नवीन वाहन खरेदीला ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद आहे. कमी ईएमआय अशा आर्थिक सुविधा सहज उपलब्ध असल्याने महिनाभर आधीपासूनच बुकिंगला सुरुवात झाली. दसऱ्याच्या दिवशी ग्राहक वाहनांची डिलिव्हरी घेण्यासाठी येतील."

- आशीर्वाद चव्हाण, वाहन विक्रेते, ठाणे

"सणासुदीत इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीला ग्राहकांची मागणी असते. त्यामुळे दसऱ्यानिमित्तही ग्राहक लॅपटॉप, मोबाईल तसेच घरगुती वापरासाठी फ्रिज, वॉशींग मशीनसारखी उपकरणे खरेदीकरिता येत आहेत."

- विकास शिंदे, इलेक्ट्रॉनिक विक्रेता


सोने बाजाराला नवी झळाळी

१) दसऱ्याच्या मुहूर्तावर सोने खरेदी शुभ मानली जात असल्याने, ग्राहकांचा दसऱ्यानिमित्त सोने खरेदीकडे अधिक कल असतो. कोरोनापायी उद्भवलेल्या टाळेबंदीमुळे मागील वर्षी आर्थिक चणचण असल्याने अनेक ग्राहकांनी सोने खरेदीकडे पाठ फिरावली होती; परंतु गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाचे चित्र काहीसे दिलासादायक असून यंदा दसऱ्यानिमित्त होणाऱ्या सोने खरेदीत ५० ते ६० टक्क्यांची वाढ झाल्याचे ठाणे शहरातील व्यापाऱ्यांनी सांगितले. १० दिवस आधीपासूनच ग्राहकांनी सोन्याच्या दागिन्यांच्या ऑर्डर देण्यास सुरुवात केली असून, उद्या (शुक्रवार) दसऱ्याच्या मुहूर्तावर दागिने घेऊन जाण्यासाठी ग्राहकांची दुकानात लगबग पाहायला मिळणार आहे.

२) गुरुवारी ठाण्यात सोन्याचा भाव (प्रतितोळा) ४७ हजार ८०० तर चांदी (प्रतिकिलो) ६५ हजार इतका होता. शुक्रवारी दसरा असल्याने सोन्याचा भाव १०० ते २०० रुपयांनी वाढण्याची शक्यता असल्याचे सराफा व्यापाऱ्यांनी सांगितले. यंदा सोने खरेदीसाठी ग्राहकांना आकर्षित करण्याच्या हेतूने सोन्याच्या घडणावळीवर ५ टक्क्यांपर्यंतची सूट, एक लाखापेक्षा अधिकच्या खरेदीवर चांदी आणि सोन्याचे कॉइन अशा विविध योजना दसऱ्याच्या विशेष मुहूर्तावर व्यापाऱ्यांकडून देण्यात येणार आहेत.

"दसऱ्यानिमित्त सोने खरेदी शुभ मानली जात असल्याने सोन्याची लहानातली लहान वस्तू का होईना, पण त्याच्या खरेदीकडे ग्राहकांचा ओढा असतो. गेल्या वर्षी ग्राहकांनी आर्थिक अडचणीमुळे दसऱ्याला हवीतशी सोने खरेदी केली नाही; परंतु या वर्षी ग्राहकांचा सोनेखरेदीला चांगला प्रतिसाद आहे."
- चेतन जैन, सराफा, ठाणे.
Remarks :
दसरा सण मोठा; खरेदीला नाही तोटा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

T20 World Cup 2024: 'हार्दिकच्या जागेसाठी मोठी चर्चा, तर सॅमसन...', टीम इंडिया निवडीवेळी काय झालं, अपडेट आली समोर

LSG vs MI IPL 2024 Live : नेहलची झुंजार खेळी, टीम डेव्हिडची हाणामारी; मुंबईनं लखनौसमोर ठेवलं 145 धावांचे आव्हान

Covishield Vaccine : शरीरात रक्ताच्या गाठी होण्याचा धोका अन् हृदयासह मेंदूवर दुष्परिणाम; कोविशिल्ड लशीमुळे होणारा TTS काय आहे?

KL Rahul T20 WC 2024 : शुन्य दिवसांपासून... भारतीय संघाची घोषणा होताच लखनौने वगळलेल्या केएलसाठी केली पोस्ट

SCROLL FOR NEXT