मुंबई

मुंबईच्या सुरक्षेसाठी नौदल, वायुदल सज्ज 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - भारतीय वायुसेनेने पाकिस्तानवर केलेल्या हल्ल्यानंतर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या महानगरी मुंबईभोवतीचे सुरक्षा जाळे अधिक भक्कम करण्यात आले आहे. मुंबई हे शत्रूराष्ट्राचे लक्ष्य असू शकते हे लक्षात घेऊन मुंबईच्या हवाई आणि सागरी सुरक्षा यंत्रणेला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईच्या सागरी सुरक्षेची जबाबदारी असलेल्या पश्‍चिम नौदल कमांडची जहाजे अरबी समुद्रातील हालचालींवर डोळ्यांत तेल घालून लक्ष ठेवीत आहेत. 

पलवामा हल्ल्यानंतरच परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. त्या वेळी सर्वत्र अतिदक्षतेचा इशारा देण्यात आल्यानंतर नौदल, भूदल व हवाई दल यांचा संयुक्त सराव रोखून त्यांना सुरक्षेसाठी तैनात होण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मंगळवारी पहाटेच्या हल्ल्यानंतर अरबी समुद्रात नौदलाच्या बोटी तैनात करण्यात आल्या आहेत. याशिवाय किनाऱ्यापासून पाच किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर तटरक्षक दलाला तैनात करण्यात आले आहे. हेलिकॉप्टरच्या साह्याने तेही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. 26-11 पासून धडा शिकलेल्या स्थानिक पोलिसांनीही मच्छीमारांकडून सागरी हालचालींची माहिती घेण्यास सुरुवात केली आहे. 

मुंबईचे कवच 
मुंबई हे देशाचे आर्थिक केंद्र. त्याचबरोबर ट्रॉम्बे आणि तारापूर ही दोन महत्त्वाची अणुकेंद्रे या परिसरात आहेत. हे पाहता हे शहर शत्रू राष्ट्राचे पहिले लक्ष्य ठरू शकते. हे ध्यानात घेऊन राजधानी दिल्लीप्रमाणेच मुंबईलाही खास हवाई कवच देण्यात आले आहे. 

उपलब्ध माहितीनुसार, बॅलिस्टिक मिसाईल डिफेन्स सिस्टिम हे ते कवच संरक्षण विकास आणि विकास संघटनेने (डीआरडीओ) निर्माण केले आहे. शत्रूच्या क्षेपणास्त्रांचा रिअल टाईम मागोवा घेतानाच ती हवेतल्या हवेतच उद्‌ध्वस्त करण्याची क्षमता या प्रणालीत आहे. पृथ्वीच्या वातावरणातच नव्हे, तर वातावरणाच्या बाहेर जाऊन आपली ही क्षेपणास्त्रे शत्रूच्या क्षेपणास्त्रांचा नायनाट करू शकतात. देशाच्या रोखाने येणारे 2000 किलोमीटर पल्ल्याचे बॅलिस्टिक क्षेपणास्त्रही नष्ट करण्याची क्षमता या यंत्रणेत आहे, असे सांगण्यात येते. मुंबईत नेमक्‍या कोणत्या ठिकाणी ही यंत्रणा बसविलेली आहे, हे एक राष्ट्रीय गुपित आहे. 

'सकाळ'ला सोशल मीडियावर लाईक करा :
'सकाळ' फेसबुक : @SakalNews
'सकाळ' ट्विटर : @eSakalUpdate
इन्स्टाग्राम : @esakalphoto

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Rohit Sharma Birthday : 'सलाम रोहित भाई...' मुंबईने टीम इंडियाच्या कर्णधारचा बड्डे अनोख्या पद्धतीने केला साजरा - Video

VIDEO: वडील असावेत तर असे! घटस्फोट झालेल्या मुलीचे माहेरी केले जंगी स्वागत; व्हिडिओ होतोय व्हायरल

Latest Marathi News Live Update : उत्तर मुंबईचे भाजपचे उमेदवार पियुष गोयाल आज भरणार उमेदवारी अर्ज

SCROLL FOR NEXT