Crime
Crime 
मुंबई

"राष्ट्रवादी'च्या माजी नगरसेवकाला अटक

सकाळवृत्तसेवा

नवी मुंबई, वाशी - दिघा येथील यादवनगरमधील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी नगरसेवक राम आशिष यादव याने एका तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी यादव याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला बुधवारपर्यंत (ता. 10) पोलिस कोठडी सुनावली आहे.

ओळखीचा फायदा उचलत यादव याने आपल्यावर सातत्याने लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. अश्‍लील व्हिडिओ आणि छायाचित्रे काढत ते समाजमाध्यमांवर प्रसारित करण्याचे धमकावल्याचेही पीडितेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे. शनिवारी (ता. 6) रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.

पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत शनिवारी रात्रीच त्याला अटक केली. रविवारी (ता. 7) त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याला 10 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी ठोठावल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक नितीन गीते यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Latest Marathi News Update: संजीव लाल यांच्या रांची येथील निवासस्थानी अजूनही नोटांची मोजणी सुरू

Children Fitness : आहाराकडे थोडे लक्ष दिले तर उन्हाळ्यातही मुले राहतील फिट अ‍ॅण्ड फाइन.! आहारतज्ज्ञ काय सांगतात ?

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT