मुंबई - मुंबईच्या विकासासाठी राबवण्यात येणाऱ्या मोठ्या प्रकल्पांसाठी तब्बल 55 हजार 432 कोटी रुपयांची गरज आहे. तसा आराखडा पालिका आयुक्त अजोय मेहता यांनी अर्थसंकल्पात मांडला आहे.
मुंबई महानगरपालिकेने कोस्टल रोड, मुलुंड-गोरेगाव जोड रस्ता या प्रकल्पांबरोबरच मलनि-सारण, पाणी आदी सुविधांसाठी मोठ्या प्रकल्पांचे नियोजन केले आहे. मुंबईची पाण्याची वाढती मागणी लक्षात घेता गारगाई आणि पिंजाळ ही दोन्ही धरणेही बांधण्यात येणार आहेत. या सर्व प्रकल्पांसाठी 55 हजार 432 कोटींचा खर्च अपेक्षित आहे. सध्या मुंबईला दरदिवशी 3850 दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होतो. गारगाई-पिंजाळ प्रकल्पांमुळे त्यात दररोज 1300 दशलक्ष लिटरहून अधिक पाण्याची भर पडण्याची शक्यता आहे. मलजलावर प्रक्रिया करून त्या पाण्याचाही फेरवापर करण्याचाही पालिकेचा विचार आहे.
मुंबईतील रुग्णालयांचा विस्तार करण्यासाठीही पालिकेने नियोजन केले आहे. विस्तार होणाऱ्या रुग्णालयांत प्रामुख्याने शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालय, कुष्ठरोग रुग्णालय, वांद्रे येथील भाभा रुग्णालय, गोवंडीतील शताब्दी रुग्णालयाचा समावेश आहे. त्यासाठी सुमारे तीन हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे.
पाच मोठे खर्चिक प्रकल्प
प्रकल्पाचे नाव ... खर्च (कोटी रुपयांत)
- कोस्टल रोड - 12969
- गारगाई, पिंजाळ प्रकल्प - 16210
- मुंबई मलनि-सारण प्रकल्प - 14368
- मुलुंड-गोरेगाव जोडरस्ता - 4678
- कचऱ्यापासून वीजनिर्मिती - 2255
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.