नवी मुंबईकर तापाने हैराण आहेत.
नवी मुंबईकर तापाने हैराण आहेत.  
मुंबई

नवी मुंबईकर सर्दी, तापाने हैराण

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : पावसामुळे वातावरणात जाणवणारा गारवा आणि पावसाने उघडीप घेतल्यानंतर जाणवणाऱ्या उष्णतेमुळे साथीच्या आजारांत वाढ होत आहे. त्यामुळे शहरात सर्दी, डोकेदुखी, घसा खवखवणे-दुखणे, अंगदुखी, ताप असा त्रास होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. रोज तीनशेहून अधिक रुग्ण उपचारासाठी येत असून, रुग्णालयातील बेडची संख्याही वाढवावी लागली आहे, असे वाशीतील नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयातील एका वरिष्ठ डॉक्‍टरांनी सांगितले. 

‘गेल्या १५ दिवसांत नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालय आणि नागरी आरोग्य केंद्रामध्ये एकूण १३ हजार १७८ रुग्णांची नोंद झाली. त्यात सर्दी आणि खोकल्याचे चार हजार ४८१ आणि तापाचे दोन हजार २९३ रुग्ण आहेत. जून महिन्यात १७ हजार ८४६ नोंद करण्यात आली होती. 

यात सर्दी, खोकल्याचे चार हजार ३१७, तर तापाचे दोन हजार ९२ रुग्णांची नोंद झाली.’ अशी माहिती पालिकेचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. दयानंद कटके यांनी दिली. जूनच्या तुलनेत जुलै महिन्याच्या पंधरवड्यातच तापाच्या रुग्ण संख्येत १०० ने वाढ झाली आहे. 

गेल्या वर्षी जूनमध्ये सर्दी-खोकल्याचे सात हजार ९६६ रुग्णांची नोंद झाली. त्यात तापाचे चार हजार २४१ रुग्ण होते. जुलैमध्ये १० हजार १०० रुग्ण संख्या नोंदवण्यात आली. तापाचे रुग्ण तीन हजार ७०० होते. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा रुग्ण संख्या कमी असल्याचे, डॉ. कटके यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : अर्चना पाटील यांच्या समर्थनार्थ पंतप्रधान मोदी यांच्या धाराशिवमधील सभेला सुरुवात

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल राहण्यासाठी बेस्ट आहे चिकनकारी कुर्ती, अशा पद्धतीने करा स्टाईल

Credit Card: ग्राहकांना मोठा फटका! 1 मे पासून क्रेडिट कार्डद्वारे बिल भरणे होणार महाग; किती वाढणार खिशावरचा भार?

T20 World Cup 2024 : IPL दरम्यान वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया होणार अमेरिकेला रवाना! तारीख आली समोर

Prajwal Revanna : 'मुलगा खोलीत तर बाप दुकानात बोलवायचा...', माजी पंतप्रधानांच्या नातवाचा सेक्स स्कँडल, कोण आहे प्रज्वल रेवण्णा?

SCROLL FOR NEXT