Raj-Thackeray
Raj-Thackeray 
मुंबई

'ईशान्य मुंबई' मनसेला द्या; राज ठाकरेंची विनंती

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे रविवारी पूत्र अमित यांच्या विवाहाचे आमंत्रण देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील ‘सिल्वर ओक’ या निवासस्थानी गेले. उभय नेत्यांमध्ये सुमारे दोन तास चर्चा झाली. या भेटीदरम्यान ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या संभाव्य आघाडीने ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघ मनसेला सोडण्याची विनंती पवार यांच्याकडे केल्याचे समजते.

‘ईशान्य मुंबई’तून राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील यापूर्वी निवडून गेले होते. त्यामुळे ठाकरे यांनी विनंती केली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेस ती मान्य करणार का, हा प्रश्‍नच असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.

ठाकरे यांचे पुत्र अमित २७ जानेवारीला मुंबईतील ‘सेंट रेजिस’ या आलिशान हॉटेलमध्ये मिताली बोरुडे हिच्याशी विवाहबद्ध होणार आहेत. चुलतबंधू, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना या विवाहसोहळ्याचे निमंत्रण देण्यासाठी राज शनिवारी ‘मातोश्री’वर गेले होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal : ''केजरीवाल अन् सिसोदिया यांच्याविरोधात एकसारखेच पुरावे कसे? सिंघवींचा सुप्रीम कोर्टात युक्तिवाद

Rahul Gandhi: राहुल गांधींनी रायबरेली निवडल्यानं निरुपम यांचा हल्लाबोल; म्हणाले, पळून गेले...

SRH vs RR, IPL 2024: 'भयानक अंपायरिंग...', हेडची बॅट हवेत होती असं सांगत माजी भारतीय क्रिकेटरने थर्ड अंपायरवर साधला निशाणा

Anil Navgane Attack: ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला, भरत गोगावलेंच्या पुत्रासह २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल

Gautam Adani: कोण आहेत गौतम अदानींचे राईट हँड? डॉक्टर ते उद्योगपती असा आहे प्रवास; चालवतात 20,852 कोटींची कंपनी

SCROLL FOR NEXT