cyber-crime
cyber-crime 
मुंबई

सोशल मीडियावर लिहिणाऱयांना मुंबई सायबर क्राईमकडून नोटीस

सकाळ डिजिटल टीम

मुंबई- सोशल मिडीयात सरकार विरोधात लिखाण करणाऱ्या तरुणांना पोलिसांकडुन नोटीस पाठवण्यात येत आहे. राज्याच्या वेगवेगळ्या भागातील 15 ते 20 तरुणांना नोटीस पाठवुन 3 दिवसात चौकशीसाठी हजर राहण्याचे मुंबई सायबर विभागाकडुन सांगण्यात आले आहे. बदनामी करणे, फसवणुक करणे या कलमांचा उल्लेख नोटीस मध्ये आहे. फेक फेसबूक प्रोफाईलवरून मुख्यमंत्री कार्यालयाची कथित बदनामी केल्याप्रकरणी मुंबई सायबर सेलकडे नोंद असलेल्या एका गुन्ह्याच्या तपासासाठी या तरुणांना चौकशीसाठी बोलवण्यात आल्याचे सायबर सेलने इमेलद्वारे कळविले आहे. 

राज्यातील ज्या तरुणांना अशा प्रकारची नोटीस आली आहे ते सर्व साधारणतः 25 ते 30 या वयोगटातील आहेत. यामध्ये विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, विरोधी पक्षाचे कार्यकर्ते, पत्रकार यांचा समावेश आहे. हे सर्व तरुण सरकारची धोरणे, महागाई, मंत्र्यांची वादग्रस्त वक्तव्ये, भ्रष्टाचाराची प्रकरणे यावर सोशल मीडीया आणि इतर माध्यमात सतत लिखाण करत असतात. 
 

सरकार विरोधात लिहिणाऱ्या तरुणांना अशाप्रकारच्या नोटीसा पाठवुन त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे. 'अशा प्रकारचा पोलिस चौकशीचा ससेमीरा हा आणिबाणीपेक्षा भीषण आहे. या तरुणांच्या लिखाणाने सरकारच्या अस्तित्वाला धक्का दिला आहे व त्यामुळे सरकारची पोलखोल झाली आहे, या चौकशीच्या नोटीसा ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी आहे,' असेही मुंडे म्ह्णाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : ''आम्ही खोक्यांच्या मागे गेलो नाहीत; कारण...'', 'सकाळ'च्या मुलाखतीत विनायक राऊत स्पष्टच बोलले

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : धोनी गोल्डन डक; जडेजामुळे चेन्नईने मारली 168 धावांपर्यंत मजल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेचा भगवान कुबेरांशी काय संबंध आहे? जाणून घ्या कारण

Job Discrimination : मुंबईत नोकरीसाठी मराठी माणसालाच नो एन्ट्री करणाऱ्या कंपनीला शिकवला धडा, एचआरने मागितली माफी!

Latest Marathi News Live Update : ठाणे, रायगडला उष्णतेचा एलो अलर्ट

SCROLL FOR NEXT