File Photo
File Photo 
मुंबई

कर्जदाराला धमकावल्याबद्दल मुथुट होम फायनान्सला नोटीस बजवा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कर्जवसुली करण्यासाठी धमकावल्याचा आरोप असलेल्या मुथुट होम फायनान्स इंडिया लिमिटेडच्या संचालकांसह पुणे पोलिसांना नोटीस बजावण्याचे आदेश गुरुवारी (ता. 21) मुंबई उच्च न्यायालयाने दिले. या आरोपांबाबत खुलासा करण्याचे निर्देशही खंडपीठाने दिले आहेत.

पुण्यातील व्यावसायिक प्रभाकर कोतवाल यांनी उच्च न्यायालयात ऍड्‌. आनंद जोंधळे यांच्यामार्फत मुथुट होम फायनान्स कंपनीच्या विरोधात याचिका केली आहे. या याचिकेवर गुरुवारी न्या. भूषण धर्माधिकारी आणि न्या. साधना जाधव यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. याचिकादाराने डिसेंबर 2016 मध्ये या कंपनीकडून 14 टक्के व्याजदराने 14 लाख 86 हजार रुपयांचे गृहकर्ज 240 महिन्यांसाठी घेतले होते. या कर्जाचे नियमित हप्ते त्यांच्या बॅंक खात्यातून कंपनीकडे जात होते. 

कोतवाल यांच्या ग्राहकांकडून त्यांच्या बॅंक खात्यात पैसे जमा झाल्यावर ती रक्कम मुथुट कंपनीला मिळत असे. सप्टेंबरमध्ये त्यांच्या ग्राहकांकडून बॅंकेत वेळेत रक्कम जमा झाली नाही. त्यामुळे त्यांना कर्जाचा हप्ता भरता आला नाही. याबाबत त्यांना दुसऱ्याच दिवशी कंपनीतून एका महिलेचा दूरध्वनी आला. तिने त्यांना हप्ता भरण्यास सांगताना औद्धत्यपूर्ण भाषा वापरली आणि आक्षेपार्ह विधानेही केली. 

या घटनेमुळे हबकलेल्या याचिकादाराने वाकडेवाडी पोलिस ठाणे आणि भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा प्रयत्न केला. परंतु, पोलिसांनी दखल न घेतल्यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात याचिका केली. न्यायालयाने पोलिस संरक्षण द्यावे आणि आपल्याला झालेल्या मनस्तापाबद्दल संबंधित कंपनीकडून नुकसान भरपाई मिळवून द्यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईचीही सुरावात खराब; चार फलंदाज तंबूत

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT