Mumbai News Esakal
मुंबई

Mumbai News: शिवरांयांचे आक्षेपार्ह व्हिडीओ स्टेटसवर ठेवल्या प्रकरणी एकाला अटक

मित्रानेच दिलेल्या तक्रारीवरुन त्याला अटक करण्यात आले आहे

अंकिता खाणे (Ankita Khane)

छत्रपती शिवाजी महाराजांचा मॉर्फ केलेला आक्षेपार्ह व्हिडिओ त्याच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवल्याच्या आरोपावरून एका २५ वर्षीय तरुणाला काल (मंगळवारी) मुंबईत अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सांताक्रूझ पूर्व येथे राहणारा शाहबाज तस्लीम खान (२५) याला त्याच परिसरातील २४ वर्षीय सचिन पाठक याच्या तक्रारीवरून अटक करण्यात आली आहे. दोघेही खासगी कंपनीत वैद्यकीय प्रतिनिधी म्हणून काम करतात आणि लहानपणापासून एकमेकांना ओळखतात, असे पोलिसांनी सांगितले आहे.

सचिन पाठकच्या तक्रारीनुसार, सोमवारी दुपारी त्याने शाहबाज तस्लीम खान यांनी ठेवलेले तानाजी: द अनसंग वॉरियर या चित्रपटातील मॉर्फ केलेल्या क्लिपचे व्हॉट्सअॅप स्टेटस पाहिले, ज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब ही पात्रे आहेत आणि एक संदेश आहे. त्यानंतर पाठक यांनी त्या व्हॉट्सअॅप स्टेटसचा व्हिडीओ रेकॉर्ड करून वाकोला पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

पाठक यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी शाहबाज तस्लीम खानवर आयपीसीच्या कलम २९५(अ) आणि ५०० आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६६(सी) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

आरोपीला तत्काळ अटक करण्यात आल्याचे वाकोला पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश खांडेकर यांनी सांगितले. अटक केल्यानंतर खानने हे चुकून केले असल्याचा दावा केला आहे. त्याच्या अटकेनंतर, आम्ही त्याला न्यायालयात हजर केले, न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती वाकोला पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक प्रकाश खांडेकर यांनी दिली आहे. पुढील तपास सुरू आहे.

जुलैमध्ये, नाशिक ग्रामीण पोलिसांनी एका १७ वर्षीय मुलावर भगवान हनुमान आणि मुघल सम्राट औरंगजेब यांच्याबद्दल इंस्टाग्रामवर कथित आक्षेपार्ह पोस्ट केल्याबद्दल आणि या भागातील हिंदू समुदायाच्या भावना दुखावल्याबद्दल गुन्हा दाखल केला होता.

तर याआधी औरंगजेबाबद्दल सोशल मीडियावर टाकलेल्या पोस्टवरून कोल्हापूर आणि अहमदनगर जिल्ह्यात हिंसाचार झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT