Maharashtra Politics : 'स्वाभिमानी'तला वाद चिघळणार? तुपकरांना 15 ऑगस्टची डेडलाईन, शेट्टी मोठ्या निर्णयाच्या तयारीत!

अध्यक्ष राजू शेट्टी यांच्या कार्यपद्धतीवर रविकांत तुपकरांची उघडपणे नाराजी
Raju Shetti vs Ravikant Tupkar
Raju Shetti vs Ravikant Tupkaresakal
Summary

'कोणतीही कारवाई एकतर्फी व्हायला नको, यासाठी बराच काळाच्या चर्चेनंतर शिस्तपालन समितीने तुपकर यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी पंधरा ऑगस्टची मुदत दिली आहे.'

जयसिंगपूर : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetti) आणि स्वाभिमानीचे माजी प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांच्यातील शीतयुद्धाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी (ता. ८) पक्षाच्या शिस्तपालन समितीची बैठक पुण्यात पार पडली.

मात्र, तुपकर बैठकीस गैरहजर राहिल्याने भूमिका मांडण्यासाठी समितीने तुपकर यांना पंधरा ऑगस्टची डेडलाईन दिली आहे. दरम्यान, तुपकर यांच्या भूमिकेनंतरच त्यांच्यावर कारवाई की समझोता याबाबतचा निर्णय होणार आहे.

Raju Shetti vs Ravikant Tupkar
Loksabha Election : मंत्रीपदाचा राजीनामा देऊन काँग्रेसचा 'हा' बडा नेता निवडणूक लढवणार? जारकीहोळी म्हणाले, हायकमांडनं मला..

शेट्टी यांनी दौऱ्यात आपल्याला विश्वासात घेतले नसल्याचा आरोप करत तुपकर यांनी शेट्टी यांच्या कार्यपद्धतीवर उघडपणे नाराजी व्यक्त केली. यानंतर तुपकर पुन्हा एकदा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडचिट्टी देऊन अन्य कोणत्या पक्षाचा विचार करणार की भाजपमध्ये साथ देणार याबाबत राजकीय क्षेत्रात वर्तुळात अनेक चर्चांचे पिक उठले.

मात्र, तुपकर यांची नेमकी भूमिका लक्षात घेण्यासाठी पक्षाच्या शिस्तपालन समितीची मंगळवारी पुण्यात बैठक पार पडली. कोणतीही कारवाई एकतर्फी व्हायला नको, यासाठी बराच काळाच्या चर्चेनंतर शिस्तपालन समितीने तुपकर यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी पंधरा ऑगस्टची मुदत दिली आहे.

Raju Shetti vs Ravikant Tupkar
Adv Ujjwal Nikam : 'पक्षाचा व्हीप काढण्याचा अधिकार जयंत पाटलांनाच, गटनेत्यालाच आपल्याकडं वळवण्याची रणनीती'

दरम्यान, बैठकीत स्वाभिमानीचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी तुपकर यांनी केलेल्या आरोपाबाबत सविस्तर खुलासाही केला. स्वाभिमानी एकसंघ राहण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. स्वाभिमानी एक कुटुंबाप्रमाणे राज्यात कार्यरत आहे. असे असताना केवळ गैरसमजातून तुपकर यांच्याकडून आरोप सुरू असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले.

Raju Shetti vs Ravikant Tupkar
Sharad Ponkshe : 'देश हिंदू राष्ट्र होईल, तेव्हाच सावरकरांचं स्वप्न पूर्ण होईल'; काँग्रेसवर टीका करत पोंक्षेंचं मोठं विधान

यावेळी प्रशांत डेक्कर यांचीही बाजू ऐकून घेण्यात आली.शिस्तपालन समितीमध्ये प्रकाश पोकळे, सावकार मादनाईक, जालिंदर पाटील, संदीप जगताप, सतिश काकडे यांची आणखीन एक समिती तयार करण्यात आली व या समितीला तुपकर यांच्या भूमिकेवर निर्णय घेण्याचा अधिकार दिला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com