मुंबई

फसवणूकप्रकरणी एकाला अटक 

सकाळवृत्तसेवा

मुंबई - सिद्ध पॉप गायक रॉडनी फर्नांडिस व त्याच्या बॅंडमधील नऊ सदस्यांची सुमारे 18 कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने मयूर अग्रवाल या संशयिताला अटक केली आहे. "फाईंडिग फॅनी' व अन्य चित्रपटांसाठी गायन केलेल्या रॉडनीला गुंतवणुकीवर 18 ते 22 टक्के परतावा देण्याचे प्रलोभन दाखवण्यात आले होते. 

"रॉडनी एंटरटेन्मेंट' या बॅंडचा प्रमुख असलेल्या रॉडनीच्या तक्रारीनुसार, 2015 मध्ये त्याची ओळख मयूर अग्रवाल याच्यासोबत झाली. त्याने गुजरातमधील मामा संजय अग्रवाल याच्यामार्फत जमिनीत पैसे गुंतवून 18 ते 22 टक्के परतावा देण्याचे प्रलोभन दाखवले. त्यानुसार ऑक्‍टोबर 2015 पासून रॉडनीने त्याच्याकडे गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. रॉडनीने पूर्वी खरेदी केलेल्या सोन्याचीही अग्रवालकडे गुंतवणूक केली. असे एकूण 15 कोटी 60 लाख रुपये 2018 पर्यंत अग्रवालकडे जमा करण्यात आले. अग्रवालने 2016 पर्यंत रॉडनीला नियमित व्याजाचे पैसे दिले. त्यामुळे त्याच्या बॅंडमधील नऊ सदस्यांनीही अग्रवालकडे सुमारे दोन कोटी 15 लाख रुपये गुंतवले. 

मयूर अग्रवालने 2017 मध्ये व्याजाची रक्कम देण्यास टाळाटाळ सुरू केली. त्यानंतर रॉडनीने पाठपुरावा केल्यावर त्याने मामाकडे दिलेली रक्कम गोरेगावमधील एका कंपनीत गुंतवल्याचे सांगितले. रॉडनीने गोरेगाव येथे संजय अग्रवालची भेट घेतली. सुरतमध्ये जमिनीत सुमारे आठ कोटी रुपये गुंतवल्याचे त्याने सांगितले. मयूरने पुण्यातील मित्र नितीन लोहारिया याच्याकडे सहा कोटी रुपये गुंतवल्याचे सांगितले. रॉडनीने वांद्रे येथे लोहारिया याची भेट घेतली असता, शेअर बाजारात पैसे गुंतवल्याचे व फक्त दोन कोटी रुपये वांद्रे येथील मित्र संजय बंगेरा याला दिल्याचे सांगितले. त्यानुसार रॉडनीने बंगेरा यांच्याशी संपर्क साधला; मयूरने पैसे दिल्याचे त्यानेही सांगितले. 

व्याजाची रक्कम मिळणे 2017 नंतर बंद झाल्यामुळे रॉडनी व त्याच्या सहकलाकारांनी 17 कोटी 77 लाखांची फसवणूक झाल्याची तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे केली. त्यानुसार संजय अग्रवाल, मयूर अग्रवाल, संजय बंगेरा व नितीन लोहारिया यांच्याविरोधात 25 फेब्रुवारीला फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यावरून पोलिसांनी मयूर अग्रवालला बुधवारी अटक केली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

IPL 2024 LSG vs RR Live Score : शतकी भागीदारी रचणारी राहुल - हुड्डाची जोडी फुटली; लखनौ 150 च्या जवळपास पोहचली

DC vs MI, IPL 2024: टीम डेविडचा कडक षटकार, मात्र संपूर्ण स्टेडियम हळहळलं; पाहा कोण जखमी झालं?

Hardik Pandya DC vs MI : सतत हसत असणाऱ्या पांड्या दिल्लीविरूद्ध मात्र जाम भडकला; Video व्हायरल

SCROLL FOR NEXT