याेजना पारधी
याेजना पारधी 
मुंबई

रायगडमध्ये योगिता पारधी यांच्या नावाची चर्चा

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग, ता. ः रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदावर पुढील अडीच वर्षे अनुसूचित जमातीची महिला उमेदवार विराजमान होणार आहे. या पदासाठी आज आरक्षण जाहीर झाले. शेकाप, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या आघाडीकडे या प्रवर्गातील तीन महिला सदस्य आहेत. त्यापैकी योगिता पारधी या तरुण आणि सुशिक्षित असल्याने त्यांचे नाव आघाडीवर आहे. 

जिल्हा परिषदेतील शेकाप, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांच्या आघाडीने अध्यक्षपदासाठी पहिली अडीच वर्षे अदिती तटकरे यांना पसंती दिली होती. उर्वरित अडीच वर्षांसाठी शेकापच्या उमेदवाराला संधी दिली जाणार आहे. त्यामुळे आरक्षणाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. आज जाहीर झालेल्या आरक्षणानुसार अनुसूचित जमातीच्या महिलेला संधी मिळणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार जिल्हा परिषदेत घडामोडींना वेग आला आहे. 

आघाडीकडे या प्रवर्गातील तीन सदस्या आहेत. त्यामध्ये पनवेल तालुक्‍यातील वावंजे गटातून विजयी झालेल्या शेकाप योगिता पारधी, वडघर गटातील पदीबाई ठाकरे यांचा समावेश आहे; तर कर्जत तालुक्‍यातील नेरळ गटातील कॉंग्रेसच्या ज्येष्ठ सदस्या अनसूया पादीर यांचा समावेश आहे. या निवडीचे सर्व अधिकार शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी आपल्याकडे राखून ठेवले असल्याचे समजते. परंतु अध्यक्षपदाची माळ योगिता पारधी यांच्या गळ्यात पडण्याची शक्‍यता असली, तरी त्याला शेकापच्या कोणत्याही नेत्याने दुजोरा दिला नाही. 
सध्या जिल्हा परिषदेच्या प्रभारी अध्यक्षपदी ऍड. आस्वाद पाटील आहेत. राष्ट्रपदी राजवट संपुष्टात आल्यानंतर अध्यक्षपदाची निवड होणार आहे. 
 
जिल्हा परिषद अध्यक्षपद निवडीबाबत शेकाप जिल्हा कार्यकारिणीची बैठक होणार आहे. यामध्ये सर्वांच्या सहमतीने उमेदवाराची निवड केली जाणार आहे. 
- विवेक पाटील, माजी आमदार 

सर्व स्तरातील व्यक्तींना संधी मिळावी, यासाठी जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी पडलेले हे आरक्षण स्वागतार्ह आहे. यातून विकासाचा समतोल साधला जाईल. शेकापकडे या पदासाठी योग्य उमेदवार असून अध्यक्षपद कोणाला द्यायचे, हे सर्वस्वी शेकापच्या नेत्यांच्या हातात आहे. 
- ऍड. आस्वाद पाटील, प्रभारी अध्यक्ष, जिल्हा परिषद 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT