मुंबई

"भाजपचा सत्तेचा अहंकार जनतेनं उतरवला"; विरोधकांकडे 117 आमदारांचे बळ.!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई, ता.25: राज्यात विरोधी पक्ष शिल्लक राहणार नाही अशा वल्गना करणार्या भाजपच्या सत्तेचा अंहकार राज्यातील जनतेनं उतरवल्याची टीका करत महाआघाडीकडे 117 आमदारांचे बळ असल्याची माहिती काॅग्रेस व राष्ट्रवादीने दिली. 

काॅग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांनी स्वतंत्र पत्रकार परिषद घेत भाजप व शिवसेनेवर हल्ला चढवला. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षात राज्यातील जनतेला केवळ दिवास्वप्न दाखवली. खोटे बोलून जनतेची दिशाभूल केली. अशी टीका करत जनतेनं युती सरकारच्या विरोधात राग वक्त केल्याचे नवाब मलिक म्हणाले. तर, काॅग्रेसमुक्त महाराष्ट्र करू अशी अवहेलना करणार्या भाजपला जनतेनं मतपेटीतून चपराक लगावल्याचे बाळासाहेब थोरात म्हणाले. 

दरम्यान काॅग्रेस-राष्ट्रवादी व सर्व मित्रपक्षांच्या आघाडीला 117 जागांवर विजय मिळाला आहे. राष्ट्रवादीचे 39 उमेदवार दुसर्या क्रमांकावर असून काही उमेदवार हजार मतांच्या फरकानं पराभूत झाले. याचाच अर्थ राज्यात शरद पवार व राष्ट्रवादीची लाट होती. असा दावा मलिक यांनी यावेळी केला. 

महाआघाडीचे संख्याबळ 

  • काँग्रेस – 44
  • राष्ट्रवादी काँग्रेस – 54
  • बहुजन विकास आघाडी – 3
  • समाजवादी पक्ष – 2
  • शेतकरी कामगार पक्ष – 1
  • मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष – 1
  • स्वाभिमानी शेतकरी संघटना – 1
  • रवि राणा - 1 आणि
  • काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत अपक्ष - 10   

WebTitle : oppositions has power of 117 MLS says congress and NCP leaders

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu-Kashmir Assembly: जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा? विधानसभेत ठराव मंजूर, भाजपचा सभात्याग! काय बदल होणार?

Ladki Bahin Yojana ₹1500 Installment : लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 ऐवजी किती पैसे जमा झाले? घरबसल्या मोबाईलवर मिनिटांत तपासा रक्कम; कशी पाहाल स्टेटस?

Udaipur ₹2 Crore Bribery Case : एसीबीच्या जाळ्यात सापडला मोठा मासा? तब्बल 2 कोटी रुपयांची घेतली लाच; एसओजी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेणारा दलाल जाळ्यात

Latest Marathi News Live Update: गुंज परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; ३० जणांना चावा

रेसलिंग विश्वावर शोककळा! सामना खेळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ४० वर्षांच्या WWE स्टार PAC चे निधन

SCROLL FOR NEXT