मुंबई

ठाण्यात अनधिकृत होर्डिंग उतरवण्याचे आदेश

सकाळवृत्तसेवा

ठाणे : पुण्यातील लोखंडी होर्डिंग कोसळून झालेल्या दुर्घटनेत चार जणांना जीव गमवावा लागल्यानंतर राज्यातील इतर महापालिकाही लोखंडी होर्डिंगबाबत सावध झालेल्या आहेत. ठाणे महापालिकेनेही याबाबत पुढाकार घेतला असून, शहरातील सर्व अधिकृत होर्डिंगधारकांना त्यांच्या होर्डिंगचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. 15 दिवसांत असा अहवाल सादर न झाल्यास त्यांच्यावर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. 

शहरातील रस्त्यांचे रुंदीकरण होत असतानाच शहरात अनेक ठिकाणी रस्त्याकडेला लोखंडी होर्डिंग उभारण्यात आली आहेत. यापैकी अधिकृत आणि अनधिकृत होर्डिंग किती हा संशोधनाचा विषय ठरला आहे. पण, महापालिकेकडून सर्व कागदपत्रांची तपासणी करून देण्यात आलेल्या परवान्यांनुसार शहरात 400 अधिकृत होर्डिंग आहेत. या होर्डिंगच्या माध्यमातून महापालिकेला महसूल मिळत असतो; पण त्याच वेळी होर्डिंगच्या निमित्ताने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलेला असल्याने महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी याबाबत दक्षता घेण्याचे आदेश जाहिरात विभागाला दिलेले आहे. 

स्ट्रक्‍चरल ऑडिटची मागणी 

धर्मराज्य पक्षाने अनधिकृत होर्डिंग व बॅनर्सवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत या विषयाचे पत्र ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांना पाठवण्यात आले होते. ठाण्यात पुण्यासारखी दुर्घटना घडू नये, यासाठी शहरातील अनधिकृत होर्डिंगवर कारवाई करण्याबरोबरच अधिकृत होर्डिंगचे तत्काळ स्ट्रक्‍चरल ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रशासनाने अधिकृत होर्डिंगची माहिती तत्काळ महानगरपालिकेच्या वेबसाईटवर नागरिकांच्या माहितीसाठी जाहीर करावी, त्याचप्रमाणे होर्डिंग परवाना मिळण्याबाबत जे निकष अथवा नियमावली पालिकेने निश्‍चित केली आहे, त्याची माहितीही संकेतस्थळावर प्रकाशित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT