File Photo
File Photo 
मुंबई

ऑर्डिनन्सचा संप चौथ्या दिवशीही सुरूच

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ऑर्डिनन्सचे खासगीकरण करण्याचा केंद्र सरकारकडून सध्या प्रयत्न सुरू आहे. त्याच्या निषेधार्थ मंगळवारपासून सुरू असलेला (ऑर्डिनन्स) आयुध निर्माणी कामगारांचा संप शुक्रवारी सलग चौथ्या दिवशीही सुरूच होता.

देशभरातील 41 ऑर्डिनन्समध्ये मंगळवार (ता. 20) पासून हा संप सुरू असून अंबरनाथमधील ओएफ आणि एमटीपीफमधील सुमारे तीन हजार कामगारदेखील या संपात सहभागी झाले आहेत. ऑर्डिनन्समध्ये भारताच्या संरक्षण दलासाठी लागणारी लष्करी सामग्री व वाहने, शस्त्रास्त्रे यांची निर्मिती केली जाते.

अंबरनाथ येथे संपाच्या चौथ्या दिवशी बहुतेक राजकीय पक्षांच्या लोकप्रतिनिधींनी कामगारांना पाठिंबा दर्शवला. केवळ कंपनीचे वरिष्ठ अधिकारी पोलिस बंदोबस्तात कंपनीमध्ये जातात आणि सायंकाळी पुन्हा कंपनीबाहेर येतात. कामगार संघटनांचे प्रतिनिधी सकाळी लवकर कंपनीच्या गेटवर जमा होत असून रात्री उशिरा घरी जात असल्याचे कामगार संघटनेचे प्रतिनिधी दिनेश कंटे यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: इन्स्टाग्रामवर यौवना अन् प्रत्यक्षात समोर आली दुसरीच बाई.. अपेक्षाभंगामुळे तरुणाने केली बेदम मारहाण

प्लेऑफची शर्यत झाली रोमांचक! CSK च्या विजयाने Points Tableचे बदलले गणित; मुंबईवर टांगती तलवार

Addiction in Teens : व्यसनांचा पाश अन् प्रकृतीचा विनाश.. पालकांनो, मुलांकडे लक्ष आहे का?

Parineeti Chopra : पहिल्याच भेटीत परिणीती चोप्रा पडली होती राघवच्या प्रेमात

Salary Hike: आनंदाची बातमी! यावर्षी कर्मचाऱ्यांची होणार 12 टक्क्यांपर्यंत पगारवाढ; अहवालात माहिती उघड

SCROLL FOR NEXT