मुंबई

अवयवदानात महाराष्ट्राची उत्तम कामगिरी, रोटो आणि सोट्टो भारतातील सर्वोत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित

भाग्यश्री भुवड

मुंबई : महाराष्ट्र रोटो आणि सोट्टोला भारतातील सर्वोत्कृष्ट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. जास्तीत जास्त जागरूकता उपक्रम, 213 अवयव दान निधी आणि प्रशिक्षण उपक्रमांचा चांगला उपयोग या सर्व कारणामुळे महाराष्ट्राच्या अवयव दान समितीला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. 

तामिळनाडूमध्ये 295 अवयव दानाची संख्या नोंद करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ महाराष्ट्रात 213 अवयव दान झाले असुन दुसऱ्या क्रमांकावर आहोत. 27 नोव्हेंबर 2020 रोजी 11 व्या भारतीय अवयवदान दिनानिमित्त, कुटुंब आणि आरोग्य कल्याण मंत्रालय, नॅशनल ऑर्गन अँड टिशू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनसह वेबकास्ट आयोजित केले होते. संपूर्ण भारतभरातील विविध राज्यातील संस्था या कार्यक्रमास ऑनलाईन जोडली गेली होती. या कार्यक्रमात दान करणाऱ्या एका कुटुंबाचा सत्कार करण्यात आला. 

दरम्यान, महाराष्ट्र राज्याने उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दलचे दोन पुरस्कार आपल्या नावावर केले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वेबकास्टच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्य वतीने आयोजित कार्यक्रमास संबोधित केले. त्यांनी डॉक्टर, रुग्णालये आणि प्रत्यारोपणासाठी योगदान दिलेल्या सर्वांचे अभिनंदन केले. ते म्हणाले की, कायदा स्वीकारणार्यापैकी महाराष्ट्र इतर राज्यांपैकी एक राज्य आहे आणि जिथे मार्गदर्शक सूचना व त्या जागी ग्रीन कॉरिडॉरची सुविधा आहे. हा पुरस्कार महाराष्ट्र राज्याला दिल्याबद्दल त्यांनी केंद्रीय मंत्रालयाचे आभार मानले.

( संपादन - सुमित बागुल )

organ donation for outstanding performance maharashtra state gets recognition

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Donald Trump: ट्रम्प बॉक्सर अन् टी-शर्टवर आले, निरोध देखील वापरला नाही; पॉर्न स्टारने केले अनेक खुलासे

Air India Express: एअर इंडिया एक्स्प्रेसची 70 उड्डाणे रद्द; 300 कर्मचारी सुट्टीवर, काय आहे प्रकरण?

Latest Marathi News Live Update : एअर इंडियाची ७० हून अधिक उड्डाणे रद्द

Sharad Pawar: प्रादेशिक पक्ष भविष्यात काँग्रेसमध्ये विलिन होणार? शरद पवारांचे मोठे भाकित, राष्ट्रवादी बद्दल देखील दिले संकेत 

Met Gala 2024 : अरबपती सुधा रेड्डीच्या ड्रेसपेक्षा नेकलेसचीच जास्त हवा, 180 कॅरेटच्या डायमंड नेकलेसने सर्वांचंच वेधलं लक्ष

SCROLL FOR NEXT