covid-mumbai.jpg
covid-mumbai.jpg 
मुंबई

कोरोना रोखण्यासाठी मुंबईत अशा प्रकारचे असू शकतात नवीन निर्बंध

दीनानाथ परब

मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागात मागच्या काही दिवसांपासून सातत्याने कोरोना रुग्णांची संख्या वाढतेय. ही रुग्ण संख्या कमी होत नाहीय. त्यामुळे एक-दोन दिवसात मुंबईत नवीन निर्बंध लावले जाण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या मनात लॉकडाउनची भीती आहे. पण सरकार पूर्ण लॉकडाउन लावणार नाही. त्याऐवजी गर्दी आणखी कमी करण्यासाठी निर्बंध लावले जाऊ शकतात.

व्यावसायिक आस्थापने, कार्यालयांमध्ये कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी करणे, मंदिर, दिर्ग्यातील गर्दीवर नियंत्रण आणि सार्वजनिक कार्यक्रमांवर बंधने अशा प्रकारचे हे निर्बंध असू शकतात. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. 

मुंबईत शनिवारी एकावर्षातील सर्वाधिक रुग्णवाढ नोंदवण्यात आली. मुंबईत काल १,७०९ करोनाबाधित आढळले. मुंबई महापालिकेने काल जानेवारी ते मार्च या तीन महिन्यातील एकाच तारखेचा म्हणजे ११ तारखेचा दाखला देऊन मुंबईत स्थिती कशी बदलतेय त्याचे उदहारण दिले. वाढत्या रुग्णसंख्येमुळे उद्धव ठाकरे यांनी काल सुद्धा लॉकडाउनबद्दलचा इशारा दिला. मंगळवारी ते राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे सदस्य, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याबरोबर चर्चा करणार आहेत. करोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्यात मास्क बंधनकारक करण्यात आलं आहे. विनामास्क फिरणाऱ्यांकडून मोठया प्रमाणात दंड वसूल केला जात आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sunil Chhetri : भारतीय फुटबॉल संघाचा कर्णधार सुनील छेत्रीने अचानक केली निवृत्तीची घोषणा

Jr NTR: ज्युनियर एनटीआरचं होतंय कौतुक; वाढदिवसाच्या आधी इतके पैसे मंदिराला केले दान

Unemployment Rate: लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत शहरांमधील बेरोजगारीचा दर वाढला; पण महिलांची स्थिती सुधारली

Virat Kohli On Retirement : 'माझं काम संपेल, मी निघून जाईन...' विराट कोहलीने निवृत्तीवर केलं मोठं विधान

Share Market Opening: शेअर बाजाराची दमदार सुरुवात; सेन्सेक्स 300 अंकांनी वधारला, कोणते शेअर्स तेजीत?

SCROLL FOR NEXT