Paduka darshan sohala 2024 81-year-old ashok belapurkar Cycle Wari
Paduka darshan sohala 2024 81-year-old ashok belapurkar Cycle Wari  Sakal
मुंबई

Paduka Darshan Sohala 2024 : ज्येष्ठाची श्रीगुरु पादुका दर्शनासाठी ‘सायकलवारी’ 81 वर्षीय अशोक बेलापुरकर निघाले वाशीला

आशा साळवी

पिंपरी : ‘भेटी लागे जीवा लागलीया आस...’ या ओवीप्रमाणे भोसरीतील वारकरी संप्रदायातील ८१ वर्षीय अशोक विष्णुपंत बेलापुरकर सायकलवरून ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने आयोजीत १८ संतांच्या ‘श्रीगुरुं पादुका दर्शन’ उत्सवासाठी निघाले आहेत.

भोसरी ते वाशी सेंटर हे अंतर जवळपास १२६ किलोमीटर आहे. रेल्वेने किंवा बसने हे अंतर पार करायचे म्हटले, तरी थकवा येतो. मात्र; बेलापुरकर यांनी ही सायकलीवर स्वार होत वारी काढली आहे. या कणखर जेष्टांना ३३ वर्षाची सायकलवरुन ‘पंढरपूर वारी’ करण्याची परंपरा आहे.

‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे श्री फॅमिली गाइडच्या माध्यमातून ‘श्रीगुरु पादुका दर्शन’ सोहळ्याचे आयोजन केले आहे. त्यात २६ व २७ मार्च रोजी वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये राज्यातील १८ संत, गुरुंच्या पादुकांचे एकाच ठिकाणी दर्शन मिळणार आहे. त्यांनी स्वतःहून सायकलवारी करुन दर्शन घेण्याचा निश्‍चय केला आहे.

या वारीची सुरूवात बेलापूरकर यांनी सोमवारी (ता.२५) दुपारी दोन वाजता भोसरी-लांडेवाडीहून दुपारी सायलकवरुन केली. ते सायकलने १०-१२ तासाचा प्रवास करणार आहेत. लोणावळ्यात विसावा घेऊन ते पुढे मंगळवारी सकाळी १० वाजता वाशीला पोहोचतील.

वयाच्या १० वर्षापासून सायकलवरून प्रवास

अशोक बेलापुरकर यांना लहानपणापासून सायकलची आवड आहे. व्यायाम आणि योगाप्रेमी असल्याने त्यांच्या जीवनात सायकलला फार महत्व आहे. वयाच्या १० वर्षापासून सायकलवरून प्रवास करत आहेत. वारकरी संप्रदायातील असल्यामुळे ते गेली ३३ वर्षे पंढरपुरची सायकलवरून वारी करत आहे.

तसेच कोल्हापुरची महालक्ष्मी, नाशिकमध्ये त्र्यंबकेश्‍वरच्या महादेवदर्शनाला, मुंबई मंत्रालयातदेखील ते सायकलवरुन जाऊन आले आहेत. त्यांनी लाखो सायकलप्रेमी तयार केल्याचे ते आवर्जुन सांगतात.

‘‘वारकरी संप्रदायात संत चरणांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. पादुकादर्शन सोहळ्यामुळे विश्वबंधुत्वाची परंपरा असलेल्या अठरा संतांच्या पादुका एकत्र आल्या आहेत. महाराष्ट्रासह अन्य राज्यातील १८ संत पादुकांचे दर्शन एकाच ठिकाणी घ्यायची संधी देणारा हा उपक्रम आध्यात्मिक ऊर्जा वाढविणारा आहे. यापूर्वी मी सायकलवरून पंढरपुरला गेलो आहे. सायकलवरूनच कोल्हापुरच्या महालक्ष्मीचे दर्शन घेतले आहे.’’

-अशोक बेलापुरकर, सायकलप्रेमी वारकरी, भोसरी.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi Live News Update: ऑटोरिक्षा अपघातात जखमी झालेल्या महिलेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली मदत

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: अभिनेते अमिताभ बच्चन यांनी बजावला मतदानाचा हक्क

Deepika Padukon : बायकोला सांभाळत रणवीरचं सहकुटूंब मतदान; दीपिकाच्या बेबी बंपने वेधलं लक्ष

धक्कादायक! नालासोपारा मतदारसंघातील तब्बल 'इतके' लाख मतदार गायब; निकालावर होणार थेट परिणाम

Magical Blanket : सत्यात अवतरलं क्षणात गायब करणारं हॅरी पॉटरचे जादुई ब्लॅंकेट, हे गॅजेट आहे कमाल

SCROLL FOR NEXT