Hemant-Mahajan
Hemant-Mahajan 
मुंबई

पाकिस्तानला जशास तसे उत्तर देणे शक्‍य! - हेमंत महाजन

सकाळवृत्तसेवा

मुंबई - पाकिस्तानकडून पसरवल्या जाणाऱ्या दहशतवादाला प्रत्येक पातळीवर जशास तसे उत्तर देणे शक्‍य आहे, असा मान्यवरांचा सूर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या स्ट्रॅटेजिक सेंटरच्या वतीने आयोजित पुलवामा आणि बालकोटनंतर पाकिस्तानच्या दहशतवादाविरुद्ध करावयाच्या उपाययोजनांबद्दलच्या परिसंवादात होता.

मुत्सद्देगिरीशिवाय सैनिकी कारवाई, दहशतवादाला दहशतवादाने उत्तर, आर्थिक कोंडी, समाजमाध्यमे, प्रसारमाध्यमे अशा मार्गानेही पाकिस्तानचे खच्चीकरण करता येणे शक्‍य आहे. याद्वारे पाकिस्तानला धडा शिकवता येऊ शकतो, असे ब्रिगेडिअर (निवृत्त) हेमंत महाजन म्हणाले.

पाकच्या दहशतवादी कारवायांबाबतचे अभ्यासक आणि ज्येष्ठ पत्रकार पुष्पेंद्र कुलश्रेष्ठ यांनी पाकिस्तानने केवळ दहशतवादी भारतात पाठविले नाही तर वेगवेगळ्या घटकांमध्येही त्यांचे हस्तक बसवल्याचे सांगितले. राजकारण, समाजकारणातही त्यांनी शिरकाव केल्याने विशिष्ट धर्माचे लांगुलचालन होताना दिसते. त्यामुळे हे कट्टरपंथी काश्‍मीरमध्ये दगडफेक करण्याचे धाडस करतात. त्यांनी विविध भागांमध्ये दंगली घडवून आणल्या आहेत. आपण धर्मनिरपेक्षतेच्या दांभिक बुरख्यात वावरत असून, याचा फायदा पाकिस्तानला भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी होतो, असे कुलश्रेष्ठ म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT