सेक्‍टर- १० मध्ये सांडपाण्यामुळे डासांची उत्‍पत्‍ती होत आहे.
सेक्‍टर- १० मध्ये सांडपाण्यामुळे डासांची उत्‍पत्‍ती होत आहे. 
मुंबई

पनवेलकरांना साथीचा ताप

सकाळ वृत्तसेवा

खारघर : खारघरमध्ये हिवताप आणि डेंगी आजाराने डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. खारघरमधील काही लॅबमधून मिळालेल्या माहितीनुसार, जवळपास दीडशेहून अधिक डेंगीचे रुग्ण असल्याची माहिती मिळाली आहे; मात्र पनवेल पालिका प्रशासनाकडे याविषयी काहीच माहिती उपलब्ध नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले आत असून पालिका केवळ बघ्याची भूमिका घेत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. 

खारघर वसाहतीत बहुतांश भागात सांडपाणी वाहिन्या भरल्याने रस्त्यावरून दुर्गंधीयुक्त पाणी वाहत आहे. काही भागात तुंबणाऱ्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली आहे. नियमित कचरा उचलला जात नाही. फवारणीही वेळेत होत नाही.  सिडको आणि पनवेल पालिकेच्या आरोग्य विभागाकडून कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना केल्याचे दिसून येत नाही. 

खारघरमध्ये मागील वर्षी हिवताप आणि डेंगीचे प्रमाण अधिक होते. या वर्षी हे प्रमाण कमी आहे. 
- डॉ. एन. बी. औटी, खासगी रुग्णालय, खारघर 

पनवेल पालिका हद्दीत २२ हिवताप आणि ९ डेंगीचे रुग्ण आढळल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. मात्र खारघरमध्ये हिवताप आणि डेंगीचे किती रुग्ण आहेत, याविषयी पालिकेकडे माहिती उपलब्ध नाही. 
- डॉ. प्रज्ञा नरवडे, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, पालिका


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

Hadapsar : वैदुवाडी झोपडपट्टीत लागलेल्या आगीत चार झोपड्या जळून खाक

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

SCROLL FOR NEXT