tweet
tweet 
मुंबई

रेल्वेला अश्लिल जाहिरातीबाबत ट्विट केले अन् तोच पडला तोंडघशी

सकाळवृत्तसेवा

मुंबई : 'जिनके घर शिशे के होते है, वो दुसरे के घरो पे पत्थर नही फेंका करते' 'वक्त' सिनेमातील राजकुमारच्या एव्हरग्रीन डायलॉगचा अनुभव आज रेल्वेच्या एका प्रवाशाला आला. आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर येणाऱ्या अश्‍लिल जाहीरातींचा जाब या प्रवाशांने ट्विटवरवरुन विचारला त्यावर सर्च हिस्ट्री डिलीट करण्याचा सल्ला रेल्वेने दिला. हे ट्विट पाचव्या क्रमांकावर ट्रेंड होत होते. 

आयआरसीटीच्या तिकीट बुकिंग ऍप्लिकेशनवर अश्‍लिल जाहीराती येत असल्याचे स्क्रिनशॉटसह ट्विट या प्रवाशाने करत रेल्वेला जाब विचारला. या ट्विटमध्ये त्यांनी आयआरसीटीसी, रेल्वे मंत्रालय तसेच हंमागी रेल्वे मंत्री पियुष गोयल यांना टॅग केले. त्याच्या या ट्विटला रेल्वेने तासाभरात प्रतिउत्तर दिले. त्यात रेल्वे म्हणते, "आयआरसीटीची गुगल ऍड सर्विसचा वापर करते. त्यात, तुमच्या इंटरनेटवरील सर्च हिस्ट्रीनुसार जाहीराती प्रदर्शित होता. कृपया आपली सर्च हिस्ट्री साफ करावी.' 

हे दोन्ही ट्विट दिवसभर चांगलेच गाजत होते. अनेक ट्विटकरांनी त्या प्रवाशांची चांगलीच फिरकी घेतली. त्यांचे ट्विट 334 वेळा रिट्‌वीट झाले. तर, रेल्वेने दिलेले उत्तर तब्बल तीन हजार 812 वेळा रिट्‌वीट झाले. संध्याकाळपर्यंत त्या प्रवाशाचे ट्विटही सोशल मिडीयावर व्हायरल झाले होते. शेवटी काय तर इंटरनेटमुळे तुम्ही कधीही तोंड घशी पडू शकता. 

काय असते गुगल ऍड सर्विस 
इंटरनेटवर अनेक वेबसाईटवर गरज नसतानाही अनेक जाहीराती दिसतात.त्यातून बेसाईटच्या मालकाला काही प्रमाणात उत्पन्नही मिळते.या जाहीराती दाखविण्यासाठी गुगल संबंधीत व्यक्तीने सर्व केलेल्या वेबसाईटनुसार जाहीराती दाखवते.म्हणजे तुम्ही एखाद्या बेबी प्रोडक्‍टची वेबसाईट सर्फ केली असेल तर दुसऱ्या वेबसाईटवर त्याच स्वरुपाच्या जाहीराती दिसतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bird Flu: देशात बर्ड फ्लूचा धोका वाढला? आरोग्य मंत्रालयाने दिली महत्त्वाची माहिती

Pregnancy Termination: SCने 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गर्भपात करण्यासाठी दिलेली परवानगी घेतली मागं; सरन्यायाधीशांनी का बदलला निर्णय?

Virat Kohli : 'तुमच्यापेक्षा माझा खेळ मी अधिक जाणतो म्हणूनच....' विराट कोहलीने टीकाकारांना दिले उत्तर

Latest Marathi News Live Update : संभाजीराजेंवर कुणी दबाव टाकला याचा सामंत आज पर्दाफाश करणार

Jharkhand High Court: कायदेशीर प्रक्रियेशिवाय घर पाडता येणार नाही; बुलडोझर कारवाईसंदर्भात झारखंड हायकोर्टाचे महत्त्वाचे निर्देश

SCROLL FOR NEXT