नवी मुंबईत दुर्गादेवीला भावपूर्ण निरोप
नवी मुंबईत दुर्गादेवीला भावपूर्ण निरोप 
मुंबई

नवी मुंबईत दुर्गादेवीला भावपूर्ण निरोप

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : नऊ दिवसांच्या नवरात्रोत्सवानंतर मंगळवारी (ता. ८) विजयादशमीच्या दिवशी शहरात देवीचे विर्सजन करण्यात आले. नऊ दिवस-रात्र देवीच्या मंडपासमोर दांडिया खेळत देवीचा जागर करण्यात आला; तर विजयीदशमीच्या दिवशी विर्सजनाच्या वेळी ढोल-ताशांच्या निनादात बेधूंद होऊन, भक्तांनी नाचत विर्सजन मिरवणूक काढून उत्साहपूर्ण वातावरणात देवीला निरोप दिला. या वेळी सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळ व घरगुती घटांचे विर्सजन करण्यात आले. विसर्जनावेळी शहरातील चौकांमध्ये पोलिस बंदोबस्त आणि विर्सजन घाटावरील सुसज्ज यंत्रणा उभारण्यात आली होती. 

नवी मुंबई महापालिकेच्या विर्सजनस्थळांवर देवीचे विर्सजन करण्यात आले. घरगुती, सोसायट्या, लहान आणि मोठ्या नवरात्री मंडळाच्या मिरवणुकांनी ठाणे-बेलापूर मार्ग, ऐरोली, दिघा, कोपरखैरणे, बेलापूर आदी ठिकाणचे अंतर्गत रस्ते आणि विर्सजनस्थळ देवी भक्तांनी व्यापले होते. शहरातील एकूण २३ तलावांमध्ये ढोल-ताशांचा गजर... फुलांची उधळण... जय भवानी...जय अंबेच्या घोषात देवीचे विसर्जन करण्यात आले. मिरवणुकीमध्ये महिला, मुले, मुली आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातगाडी, टेम्पो, ट्रक आदी वाहनांवर बसवून देवीवर फुलांची उधळण करत मिरवणूक काढली. या वेळी फुलांची आकर्षक आरासही अनेक मंडळांनी केली होती. विर्सजन घाटाच्या ठिकाणी स्वच्छ आणि इतर स्वयंसेवी संघटनांच्या वतीने निर्माल्य टाकण्यासाठी सोय करण्यात आली होती.

पोलिसांचा चोख बंदोबस्त
पालिकेच्या वतीने देवीच्या विर्सजनासाठी विशेष व्यवस्था तैनात करण्यात आली होती. गणेश घाटावर सुरक्षा मार्गदर्शक त्याचबरोबर सुरक्षा गार्ड तैनात करण्यात आले होते; तर अग्निशमक दलाचे पथक, आरोग्य व्यवस्था, विद्युत विभाग या निमित्ताने कार्यरत होते. पालिकेच्या विविध प्रभाग कार्यालयांतील अधिकारी वर्गाबरोबरच पोलिसांचादेखील खडा पहारा विर्सजन घाटावर पहावयास मिळाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

Latest Marathi News Update: संजीव लाल यांच्या रांची येथील निवासस्थानी अजूनही नोटांची मोजणी सुरू

Children Fitness : आहाराकडे थोडे लक्ष दिले तर उन्हाळ्यातही मुले राहतील फिट अ‍ॅण्ड फाइन.! आहारतज्ज्ञ काय सांगतात ?

Pakistan: सौदीच्या प्रिन्सने पाकिस्तानला पाठवली ५० लोकांची खास टीम, शाहबाज सरकारसोबत नेमकं मिशन काय?

SCROLL FOR NEXT