मुंबई

Phone Tapping Case: रश्मी शुक्लांचा जबाब नोंदवला

विराज भागवत

शुक्लांनी आरोप फेटाळून लावल्यामुळे सायबर आता आणखी पुराव्यांच्या शोधात

मुंबई: बहुचर्चित फोन टॅपिंग (Phone Tapping Case) प्रकरणात अखेर मुंबई पोलिसांनी IPS अधिकारी रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांचा जबाब नोंदवला. गोपनीयतेच्या कायद्याअंतर्गत (Secret Act) फोन टॅपिंगविरोधात एक FIR नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणी रश्मी शुक्ला यांचा जबाब हैदराबादमध्ये (Hyderabad) नोंदवण्यात आला. रश्मी शुक्ला सध्या हैदराबादमध्ये CRPFच्या अतिरिक्त महासंचालकपदी कार्यरत आहेत. त्यामुळे जबाब (Statement) नोंदवण्यासाठी मुंबईला येणे शक्य नाही असं शुक्ला यांनी स्पष्ट केलं होतं. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या परवानगीने शुक्ला यांचा जबाब हैदराबादमध्ये नोंदवण्यात आला. (Phone tapping case Rashmi Shukla statement recorded Mumbai police gathering more proof)

मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पाच अधिकाऱ्यांची एक टीम हैदराबादला रश्मी शुक्ला यांचा जबाब नोंदवण्यासाठी गेली होती. १९ आणि २० मे या दोन दिवस त्यांचा जबाब नोंदवून घेण्यात आला. सूत्रांच्या माहितीनुसार, रश्मी शुक्ला यांनी FIR मध्ये त्यांच्यावर करण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. त्यामुळे आता पुढील कोणतीही कारवाई करण्याआधी BKC सायबर पोलीस तांत्रिक स्तरावरील पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या टीमला रश्मी शुक्ला यांचा जबाब त्यांच्या वकिलांच्या उपस्थितीत नोंदवण्याची परवानगी दिली होती. तसेच, संपूर्ण जबाब हा व्हिडीओ रेकॉर्डिंग करावा, असंही सांगितलं गेलं होतं. राज्यातील काही महत्त्वाची गोपनीय माहिती राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मिळाल्यानंतर अज्ञातांविरोधात या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ramesh Chennithala : मतदारांचा कल ‘इंडिया’ आघाडीकडे

Loksabha Election 2024 : मोदी, ठाकरे, गांधी, पवार यांचीच हवा

Election Commission : निवडणूक आयोगाकडून तंत्रज्ञानस्नेही कारभाराला प्राधान्य

Devendra Fadnavis : कल्याण-मुरबाड रेल्वेमार्ग नगरपर्यंत नेणार

Success Story : पोरीची जिद्दच लय मोठी! अपघातात हात गमावला तरी अनामता डगमगली नाही, बोर्डात मिळवले ९२ टक्के मार्क्स

SCROLL FOR NEXT