2
मुंबई

लँडिंग करताना विमान धावपट्टीवर घसरले

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : सोमवारी मध्यरात्री मुंबई विमानतळावर विमान लँड करताना विमान धावपट्टीवर घसरले, मात्र पायलटने वेळीच विमानावर नियंत्रण मिळविल्याने अपघात होण्यापासून ते थोडक्यात बचावले. सदर घटनेनंतर मुख्य रनवे बंद करण्यात आला आहे. 

या घटनेत कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जनसंपर्क विभागातर्फे देण्यात आली आहे. स्पाइसजेटचे एसजी 6237 हे विमान जयपूरहून मुंबईला आले होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. विमान उतरविताना पायलटकडून काहीतरी गडबड झाल्याची शंका प्रवाशांना आल्याने विमानामधून बाहेर पडण्यासाठी प्रवाशांमध्ये गोंधळ उडाला होता.

सध्या मुंबईत मुसळधार पाऊस सुरू आहे. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्याने पायलटलाही धावपट्टीचा अंदाज आला नाही. त्यामुळे विमान धावपट्टी ओलांडून पुढे गेले. यंदा मुंबईत गेल्या दोन दशकांमधील सर्वाधिक पाऊस पडला आहे. त्यामुळे रेल्वे आणि विमानसेवांवर परिणाम झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update : मतदानाच्या दिवशी पावसाची शक्यता; पुढील चार दिवस दुपारनंतर ढगाळ हवामानाचा अंदाज

Vladimir Putin: 'आम्ही चर्चेस तयार पण...', पाचव्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेताच पुतिन यांची पाश्चिमात्य देशांना साद

MS Dhoni: 'थाला'ने गुंतवणूक केलेल्या कंपनीचा मेगा प्लॅन; पुण्यात उभारणार देशातील सर्वात मोठी फॅक्टरी

Akshaya Tritiya 2024 : सोन्याचा झुमका, हिऱ्याची अंगठी अन् बरंच काही..! अक्षय तृतीयेला पत्नीला गिफ्ट करा 'हे' दागिने

Yuvraj Singh on Rohit Sharma : 'जीवलग मित्राने वर्ल्डकप जिंकलेला पाहायचेय...' सिक्सर किंगने रोहित शर्माचे केले तोंड भरून कौतुक

SCROLL FOR NEXT