शताब्दी रुग्णालयातील प्लाझ्मा केंद्र कागदावरच; इमारतीच्या पेचामुळे रखडपट्टी 
मुंबई

शताब्दी रुग्णालयातील प्लाझ्मा केंद्र कागदावरच; इमारतीच्या पेचामुळे रखडपट्टी

समीर सुर्वे

मुंबई : गोवंडीतील शताब्दी रुग्णालयात होणारे प्लाझ्मा फ्रॅक्‍शनेशन केंद्र सहा वर्षांपासून कागदावरच आहे. आता किमान पुढील दोन वर्षे तरी ते सुरू होण्याची शक्‍यता नाही. दरम्यानच्या काळात जुन्या इमारतीत केंद्र सुरू करणे अथवा नवी इमारत उभारण्याबाबत निर्णय झालेला नाही. या पेचामुळे केंद्रच रखडले आहे.

रक्तद्रव्ये (प्लाझ्मा) तसेच इतर घटक वेगळे करण्यासाठी स्वतंत्र प्रयोगशाळेची आवश्‍यकता आहे. असे केंद्र गोवंडी येथील पंडित मदनमोहन मालविया शताब्दी रुग्णालयात सुरू करण्याचा निर्णय 2014 मध्ये महापालिका प्रशासनाने घेतला होता. मात्र, अद्याप ते सुरू झालेले नाही. नोव्हेंबरच्या सुरुवातीला महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शताब्दी रुग्णालयाच्या विस्ताराबाबत चर्चा झाली. त्या चर्चेवर प्रशासनाने या आठवड्यात स्थायी समितीपुढे माहिती मांडली आहे. 

सभागृह नेत्या तृष्णा विश्‍वासराव यांनी केईएम रुग्णालयातील प्लाझ्मा फ्रॅक्‍शनेशन युनिट शताब्दी रुग्णालयात स्थलांतरित करण्याची मागणी केली होती. त्यानुसार ते शताब्दी रुग्णालयात स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी सल्लागाराचीही नियुक्ती करण्यात आली आहे. ज्या प्रस्तावित इमारतीत हे केंद्र स्थलांतरित करण्यात येणार आहे ती 35 वर्षे जुनी आहे. त्यामुळे ती पाडून नवी इमारत उभारावी, असा अहवाल सल्लागाराने दिला आहे. आहे त्या इमारतीत केंद्र सुरू करावे का नवी इमारत बांधावी, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. त्याबाबतचा निर्णय झाल्यानंतर बांधकाम कंत्राटदार आणि यंत्राच्या खरेदीसाठी निविदा सादर केल्या जातील, असे महापालिकेने स्थायी समितीला सादर केलेल्या लेखी उत्तरात नमूद केले आहे. 

काय आहे प्लाझ्मा फ्रॅक्‍शनेशन सेंटर? 
रक्ताबरोबरच रक्तातील द्रव्ये, रक्तपेशी आणि पांढऱ्या पेशी (प्लेटलेट) वैद्यकीय उपचारासाठी वापरल्या जातात. भारतात प्लाझ्मा फ्रॅक्‍शनेशन केंद्राची संख्या अपुरी असल्याने अनेक वेळा रक्त वाया जाते. दुसऱ्या बाजूला रक्तद्रव्ये, रक्तपेशी आणि पांढऱ्या पेशींची कमतरता असते. फ्रॅक्‍शनेशन केंद्रात रक्तातील घटक वेगळे केले जातात. 

----------------------------------------------
(संपादन : गोरक्षनाथ ठाकरे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दोन लॅब, फक्त ४९ अधिकारी, अन्नसुरक्षेचं FDAसमोर आव्हान; भेसळखोरांवर कारवाया वाढल्यानं यंत्रणेवर ताण

Sagreshwar Wildlife Sanctuary : 'सह्याद्री'च्या कुशीत खुललं पर्यटन! कडेगावातील सागरेश्वर, चौरंगीनाथ पर्यटकांना खुणवतोय; पावसाळ्यात घ्या मिनी महाबळेश्वरचा अनुभव

'स्प्लेंडर फिरवतो माझा जानू...' ट्रेडिंग गाण्यावर कमळी मालिकेतील कलाकरांचा भन्नाट डान्स, Viral Video

Nanded Hingoli Toll Plaza: वसुली जोरदार! ८० किमी अंतरात २ टोल नाके, नांदेड-हिंगोली महामार्गावर नियमाला हरताळ

Latest Marathi News Live Update : अहिल्यानगर शिक्षक बँकेच्या सभेत प्रचंड गोंधळ; शिक्षिकाही एकमेकींच्या अंगावर धावल्या

SCROLL FOR NEXT