ठाणे : पीएमसी बॅंकेत नागरिकांचे अडकलेले पैसे परत मिळावेत यासाठी ठाण्यातील ब्रह्मांड येथील पीएमसी बॅंकधारकांनी रविवारी ब्रह्मांड परिसरातून मोर्चा काढला. (छायाचित्र : दीपक कुरकुंडे)
ठाणे : पीएमसी बॅंकेत नागरिकांचे अडकलेले पैसे परत मिळावेत यासाठी ठाण्यातील ब्रह्मांड येथील पीएमसी बॅंकधारकांनी रविवारी ब्रह्मांड परिसरातून मोर्चा काढला. (छायाचित्र : दीपक कुरकुंडे) 
मुंबई

ठाण्यातील पीएमसी खातेदारांचा मतदानावर बहिष्कार?

सकाळ वृत्तसेवा

ठाणे : दिवाळीसण, लग्नसराई, औषधोपचारांनादेखील हातात पैसे नसल्याने पीएमसी बॅंकेतील खातेधारक सध्या आर्थिक अडचणींना तोंड देत आहेत. त्यामुळे ठेवीदारांचे पैसे मिळाले नाही, तर विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकू; असा इशारा देत पीएमसी बॅंक खातेधारकांनी रविवारी ठाण्यात मूक मोर्चा काढला. खातेधारकांशी भांडुप येथील शाखेत सोमवारी चर्चा करण्याचे आश्‍वासन बॅंकेकडून देण्यात आले आहे.

पीएमसी बॅंक ही जुनी व विश्‍वसनीय बॅंक आहे. ठाण्यात साधारणतः या बॅंकेच्या सात शाखा असून हजारो ग्राहक आहेत. ब्रह्मांड शाखेतील खातेधारकांनी रविवारी धर्माचा पाडा ते ब्रह्मांड मार्गावर मूक मोर्चा काढत त्यांना भेडसावणाऱ्या समस्येकडे सर्वांचे लक्ष वेधले. खातेधारक अनिल सोनावणे म्हणाले, गेल्या १२ वर्षांपासून आमच्यासह अनेक खातेधारकांची या बॅंकेत खाती तसेच ठेवी आहेत. 

दिवाळीच्या खरेदीसाठी आमच्या हातात पैसे नाहीत, काही नागरिकांना पैसे काढता येत नसल्याने त्यांची शस्त्रक्रिया रखडली आहे. कोणाचे लग्न ठरले आहे. ज्येष्ठ नागरिकांची यामध्ये खूप परवड होत आहे. अनेक सोसायट्यांची खाती या बॅंकांत असून त्यांचेही व्यवहार ठप्प झाले आहेत. आम्हाला आमचे पैसे परत द्या, अन्यथा येत्या विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकू, असा इशारा नागरिकांनी या वेळी मोर्चातून 
दिला आहे.

या वेळी ब्रह्मांड शाखेच्या व्यवस्थापकांनी खातेधारकांना सोमवारी भांडुप येथील शाखेत अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तुमचे म्हणणे मांडू असे आश्‍वासन दिले. तसेच नगरसेवक मनोहर डुंबरे यांनीही निवडणुकांनंतर याविषयी मुख्यमंत्र्यांसोबत बोलणी करण्याचे आश्‍वासन दिल्याचे सोनावणे 
यांनी सांगितले.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT