मुंबई

सिगारेट ओढणाऱ्यांवर पोलिस हवालदारांचा दंडुका 

सकाळवृत्तसेवा

मुंबई : रस्त्यावर, जागा मिळेल तिथे सिगारेट ओढणाऱ्यांवर आता पोलिस हवालदारही कारवाई करू शकणार आहेत. यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांतील मुख्य सचिवांना पत्र लिहिले आहे. महापालिका अधिकाऱ्यांनाही हे अधिकार मिळावेत, असा उल्लेख या पत्रात करण्यात आला आहे. 

सिगारेट तंबाखू विरोधी कायद्याची (कोटपा -2003) कठोर अंमलबजावणी आणि उल्लंघनकर्त्यांवर जलद कारवाई करणे शक्‍य व्हावे म्हणून दंडात्मक कारवाईचे अधिकार आता वाढवण्यात आले आहेत. यापूर्वी पोलिस उपनिरीक्षक पदावरील अधिकाऱ्यांनाच दंडात्मक आणि फौजदारी कारवाईचे अधिकार देण्यात आले होते. 

सार्वजनिक ठिकाणी, शाळा-महाविद्यालय, सरकारी कार्यालये परिसरात धूम्रपान करून सार्वजनिक आरोग्य बिघडवणाऱ्यांवर सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंधक कायदा (कोटपा-2003) अंतर्गत पोलिसांमार्फत कारवाई केली जाते. देशात सार्वजनिक धूम्रपान आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या सेवनामुळे होणाऱ्या कॅन्सरसारख्या आजारात लाखो लोकांचा मृत्यू होत आहे. तेव्हा विद्यार्थी आणि युवकांना तंबाखूजन्य पदार्थांच्या व्यसनापासून वाचवण्यासाठी कोटपा कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्यासाठी अधिकाऱ्यांची कमतरता भासत असल्याने उपनिरीक्षक पदाप्रमाणे पोलिस हवालदार आणि महापालिकेत समदर्जाच्या अधिकाऱ्यांना दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार देण्यात यावेत, असे पत्र आरोग्य आणि कुटुंब मंत्रालयाचे सहसचिव विकास शील यांनी दिले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: बर्गर खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू, मुंबईत घडली धक्कादायक घटना, वाचा नक्की काय आहे प्रकरण

Mayawati: "जोपर्यंत तो पूर्ण..." मायावतींनी तडकाफडकी भाच्याला राष्ट्रीय संयोजक पदावरून हटवले

Video: रांग मोडून आत शिरला! आप आमदाराच्या मुलाची दादागिरी; पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांना मारहाण

Hindustan Zinc : हिंदुस्थान झिंकच्या शेअर्समध्ये तेजी, डिव्हिडेंडच्या आशेने शेअर्समध्ये जोरदार खरदी...

Covishield Vaccine: "बनवणारही नाही अन् विकणारही नाही," दुष्परिणाम समोर आल्यानंतर कोव्हिशिल्डबाबत मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT