ulhasnagar
ulhasnagar 
मुंबई

अपहरण केलेल्या चिमुकल्याची एका तासातच सुटका

दिनेश गोगी

उल्हासनगर : घराच्या बाहेर खेळत असणाऱ्या चिमुकल्याच्या सभोवताली कुणीच नसल्याचे बघून त्याचे अपहरण करून पलायनच्या तयारीत असलेल्या आरोपीच्या मुसक्या आवळण्याची आणि अपहरणकर्त्यांच्या तावडीतून चिमुकल्याची सुटका करण्याची कामगिरी उल्हासनगरातील हिललाईन पोलिसांनी केली आहे. 

उल्हासनगर कॅम्प 5 मधील झुलेलाल मंदिर येथिल सचिन ससाणे यांचा दोन वर्षिय मुलगा मोहित हा काल सकाळच्या सुमारास इमारतीच्या आवारात खेळत होता.त्याच्या सभोवताली कुणीच नव्हते. त्यावेळी एका दाढी वाढलेल्या अज्ञात इसमाने त्याचे अपहरण केले.आई वडिल व शेजाऱ्यांनी शोधा शोध करुनही तो न सापडल्याने सचिन ससाणे यांनी हिललाईन पोलिसात तक्रार दाखल केली.

पोलिसांनी तातडीने तपास चक्र फिरवुन एका तासात शकील नामक संशयित व्यक्तीस ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपी शकील ह्याला खाक्या दम दाखवताच त्याने लपवून ठेवलेल्या चिमुकल्याच्या पोलिसांना दिले.आणि पोलिसांनी फक्त एका तासात मोहित या चिमुकल्याला त्याच्या आई वडिलांच्या स्वाधीन केले. ही कामगिरी पार पाडणारे हिललाईन ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम पलंगे, सहाय्यक उपनिरिक्षक मनोज खेडकर, डि.जी.चव्हाण, पि.पि.धुम यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होऊ लागला आहे.शकील शेख याला न्यायालयात हजर केले असता त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. वातावरण पाहता आईवडिलांनी लहान मुलांना एकटे सोडू नये असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक घनश्याम पलंगे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : सुप्रिया सुळे अजित पवारांच्या घरी दाखल

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

Session Court : लैंगिक छळ प्रकरणात माजी पंतप्रधान आणि माजी मुख्यमंत्र्यांचे नाव वापरण्यास बंदी; न्यायालयाचा आदेश जारी

Rohit Sharma : 6,8,4,11 आणि 4... वर्ल्ड कपच्या तोंडावर रोहितला झालं तरी काय? BCCI अन् चाहते टेन्शनमध्ये

Lok Sabha Voting 3rd Phase : महाराष्ट्रात सकाळी नऊ वाजेपर्यंत सर्वात कमी मतदान; पश्चिम बंगालमध्ये सर्वाधिक मतदानाची नोंद

SCROLL FOR NEXT