File Photo ANI
मुंबई

जामीन नाकारल्यानंतर हालचालींना वेग; राणेंच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवला

नितेश राणे यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे.

सुधीर काकडे

भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High-count) नाकारला. त्यानंतर आता नारायण राणे (Narayan Rane) यांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. यापूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणेंवर झालेल्या कारवाईप्रमाणेच पोलीस नितेश राणेंना अटक करणार का अशी चर्चा सूरू आहे. मात्र नितेश राणे हे लवकरच सर्वोच्च न्यायालयात जाणार आहेत. मुंबई उच्च न्यायालयात नितेश राणे यांची सुनावणी पूर्ण झाली असून राणेंना मोठा धक्का बसला आहे. (Nitesh Rane Bail Rejected)

दुपारी दोन वाजता या प्रकरणाची उर्वरित सुनावणी पार पडणार असून राणे यांच्यासोबत नाव आलेले मनिष दळवी यांच्या जामीनावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केलंय. मात्र नितेश राणे यांना तूर्तास जामीन नाकारण्या आला आहे. सिंधुदूर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीआधी सेनेचे नेते संतोष परब यांच्यावर हल्ला झाला होता. या हल्ल्याच्या मास्टरमाईंडला दिल्लीतून पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर संपूर्ण प्रकरणात नितेश राणेंचा हात असल्याचे पुरावे पोलिसांना मिळाल्याचं म्हटलं जातंय. यानंतर राणेंनी कोर्टात धाव घेतली होती. अखेर त्यांचा अटकपूर्व जामीन नाकारण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran-America War: वडिलांच्या हत्येचा बदला घेणार! मोज्तबा खामेनेई यांची शपथ; युद्ध भडकणार?

Supriya Sule: 'लाडकी बहीण' योजनेत भाऊ कसा?; सुप्रिया सुळे यांचा महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल; कर्जमाफीची फक्त घोषणाबाजी!

Maratha Reservation: अंतरवाली सराटी लाठीमार प्रकरण; मराठा आंदोलकांवरील ३९ गुन्हे मागे, १० प्रस्ताव न्यायालयात प्रलंबित

Gangapur Accident: गंगापूर-वैजापूर रस्त्यावर भीषण अपघात! एसटी-दुचाकीची समोरासमोर धडक; शिर्डीच्या तरुणाचा जागीच मृत्यू

India vs England 5th T20 : पाचव्या टी-२० सामन्यातही भारताचा लाजिरवाणा खेळ; इंग्लंडने दिले २५८ धावांचे आव्हान, बटलर-हॅरी ब्रूकची तुफानी खेळी

SCROLL FOR NEXT