pm narendra modi  esakal
मुंबई

PM Narendra Modi: पंतप्रधानाच्या आगमनामुळे Navi Mumbaiमध्ये रस्ते ; पदपथ झाले चकाचक !

सकाळ डिजिटल टीम

PM Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खारघरमध्ये आगमन होणार असल्याने महापालिका आणि सिडको महामंडळ कामाला लागले आहे. शहरातील रस्ते, पदपथ स्वच्छ करण्यासाठी प्रशासनाची लगबग सुरु झाली असून पदपथांवरील झाडी-झुडपे गायब झाली असून रंगरंगोटीमुळे खारघर चकाचक झाल्याचे चित्र आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ‘नमो महिला सशक्तीकरण’ या अभियानाचा शुभारंभ होणार आहे. खारघर सेक्टर ३३ येथील सेंट्रल पार्कच्या मैदानावर पुढील आठवड्यात या अभियानाचा महासोहळा होणार आहे. याकरिता खारघरच्या प्रवेशद्वारापासून ते मैदानाच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यांवर महापालिका प्रशासनातर्फे सर्व विकासकामांना वेग आला आहे.

दोन दिवस गोल्फकोर्स येथे नवी मुंबई पोलिस, कोकण विभागीय आयुक्त, रायगड जिल्हाधिकारी, सिडको, नवी मुंबई आणि पनवेल महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीत विकासकामांना वेग आला आहे.

खारघरमधील सेंट्रलपार्क मैदानापासून रस्त्यांमधील दुभाजकांच्या रंगरंगोटी केली जात आहे. तर दुर्दशा झालेल्या खारघरमध्ये रस्त्यांची देखील दुरुस्ती केली जात असल्याने पंतप्रधानांच्या आगमनामुळे रस्ते गुळगुळीत झाले आहेत. त्यामुळे दोन दिवसांमध्ये खारघर परिसराचा चेहरामोहरा बदलेला असल्याने पनवेल महापालिकेची संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित झाली आहे.

व्हिआयपींमुळे यंत्रणा अलर्टवर

पावसाळ्यात खारघर नोडच्या रस्त्यांची चाळण झाली आहे. खारघरचे रस्ते सिडकोने महापालिकेला हस्तांतर केल्यामुळे आणि महापालिकेचे रस्त्यांची निविदा प्रक्रियेत असल्याने या रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीकडे कंत्राटदारांनी दुर्लक्ष केले आहे. गेल्या वर्षीही हे रस्ते सिडकोकडे असताना त्यांची अवस्था वाईट झाली होती. परंतु, याचदरम्यान केंद्रीय मंत्री अमित शहा यांचे ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या सत्कार सोहळ्याकरीता खारघरमध्ये आगमन होणार असल्याने तेव्हा रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी सर्व यंत्रणा कामाला लागली होती. तर यंदा पंतप्रधानांचे निमित्त चालून आल्याने पावसाळ्यानंतर केंद्रीय मंत्र्यांच्या आगमनाची इच्छा खारघरवासी व्यक्त करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Devendra Fadnavis : फडणवीस-शिंदे वेगळे लढणार! भाजपच्या मंत्र्यांनीच दिला मोठा इशारा

Thane News: कल्याणमध्ये मंगळवारी पाणीबाणी! ९ तास पाणीपुरवठा बंद

Shocking Crime : संतापजनक ! आईच्या प्रियकराचा ८ वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, नशेच्या गोळ्या दिल्या अन्...

Dmart Sale : डीमार्ट तुम्हाला लुटतंय? DMart बाहेर आईस्क्रीम,पॉपकॉर्न विकणारे कोण असतात माहितीये? हे सिक्रेट पाहा नाहीतर खिसा होईल रिकामा

AI Career: AI मध्ये करिअर करायचंय? ऑस्ट्रेलियातील टॉप युनिव्हर्सिटीजची यादी येथे पहा!

SCROLL FOR NEXT