खोपोली पालिका
खोपोली पालिका 
मुंबई

खोपोलीत भाजप-शिवसेनेत दरी वाढली 

सकाळ वृत्तसेवा


खोपोली : खोपोली पालिकेच्या उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी शिवसेना भाजपला विश्‍वासात घेत नसल्याचा आरोप भाजप शहराध्यक्ष श्रीकांत पुरी यांनी केला आहे. पुरी यांच्या आरोपामुळे उपनगराध्यक्ष निवडणुकीपूर्वी शिवसेना-भाजपमध्ये दरी निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या वेळी पालिकेतील भाजप गटनेते तुकाराम साबळे, भाजप जिल्हा सचिव शरद कदम आदी उपस्थित होते. 

खोपोली नगरपालिकेत शिवसेना-भाजप यांच्यात निवडणुकीनंतर युती झाली होती. अडीच वर्षांपूर्वी उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीदरम्यान तीन नगरसेवक असलेल्या भाजपची मनधरणी करणारे शिवसेनेचे उपनगराध्यक्ष राजू गायकवाड यांनी राजीनामा दिल्यानंतर मात्र भाजपला विसरले आहेत. उपनगराध्यक्ष पदासाठी आगामी रणनीतीबाबत शिवसेना नेते भाजपला विश्‍वासात घेत नाहीत असा आरोप पुरी यांनी करून त्यांनी अप्रत्यक्षपणे शिवसेना नेते महेंद्र थोरवे यांच्यावरच शरसंधान साधले आहे.

गायकवाड यांनी राजीनामा दिल्यानंतर शिवसेनेच्या गटनेत्यांनी परस्पर नगरसेविका विनिता कांबळे-औटी यांना पुढील उपनगराध्यक्षपदाच्या उमेदवार म्हणून घोषित केले. आता शिवसेना नेतृत्व बहुमतासाठी राष्ट्रवादी पक्षाची मनधरणी करत आहेत, परंतु होत असलेल्या चर्चेदरम्यान अद्याप युतीमध्ये असलेल्या भाजपला विश्‍वासात घेत नसल्याबद्दल त्यांनी आश्‍यर्य व्यक्त केले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT