संग्रहित
संग्रहित  
मुंबई

अनियमित बस सेवेमुळे मनस्ताप

सकाळ वृत्तसेवा

रसायनी ः पनवेल एसटी बस आगारातून दांड व सावळेमार्गे परिसरात बस सेवा सुरू आहे. रसायनी-पाताळगंगा परिसरातून पनवेल, नवी मुंबईकडे कामावर जाणाऱ्या; तसेच पनवेल, नवी मुंबईकडून रसायनीकडे येणाऱ्या कामगारांसाठी एसटीच्या बस अनियमित वेळेत सोडण्यात येतात. त्यामुळे त्यांना कामावर जाण्यास उशीर होतो आणि एसटीचा बस पास काढूनही आर्थिक भुर्दंड सहन करावा लागतो. त्यामुळे या बसने जाणाऱ्यांकडून नाराजी व्यक्त होत आहे. 

पनवेल एसटी बस आगारातर्फे दांड व सावळेमार्गे वाशिवली, लोहोप, वडगाव, सवणे, जांभिवली, आपटे आदी बसच्या फेऱ्या चालवण्यात येत आहेत. या एसटी बसने दररोज वासांबे मोहोपाडा, चांभार्ली, वडगाव, कराडे खुर्द, जांभिवली, चावणे, आपटे, गुळसुंदे, वावेघर, तुराडे, सावळे, पोसरी आदी ग्रामपंचायतींच्या हद्दीतील हजारो विद्यार्थी, कामगार व इतर प्रवासी पनवेल, नवी मुंबई उपनगरात जातात. तसेच पाताळगंगा आणि अतिरिक्त पाताळगंगा औद्योगिक क्षेत्रातील, तसेच क्षेत्राबाहेरील कारखान्यांत कामावर येत असतात. 

सकाळी वाशिवली, वडगाव, लोहोपहून दांडमार्गे पनवेल पावणेआठ ते साडेनऊदरम्यान; तसेच सायंकाळी पनवेलहून दांडमार्गे वाशिवलीकडे सात ते साडेआठदरम्यान येणाऱ्या तीन बसशिवाय दुपारी पनवेलहून सव्वादोन वाजताची दांडमार्गे वाशिवली एसटी बस अनियमित वेळेत सुटते, अशी प्रवाशांची तक्रार आहे. त्यामुळे नवी मुंबई, पनवेल आदी ठिकाणी कामगारांची गैरसोय होते. त्यामुळे त्यांच्याकडून नाराजी व्यक्त होत आहे. एसटी बस रद्द झाल्यास इतर खासगी वाहनांद्वारे जाण्यास जास्त वेळ लागतो; शिवाय 
एसटी बस पास काढलेला असल्याने आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागतो. त्यामुळे सर्व एसटी बस नियमित वेळेत सोडण्यात याव्यात, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. 

सकाळी कामावर जाताना किंवा संध्याकाळी परत येताना आठवड्यातून दोन-तीन वेळा एसटी बस रद्द होण्याचे प्रकार घडतात. तसेच काही वेळा एसटीच्या अनियमित बसमुळे उशीर होतो. पास असूनही खासगी वाहनाने प्रवास करावा लागतो. 
- भास्कर रावळ, रीस, मोहोपाडा 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT