संग्रहित
संग्रहित  
मुंबई

जिल्‍ह्यात काँग्रेसला घरघर

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग: जिल्ह्यात प्रमुख पक्ष राहिलेल्या काँग्रेसची फारच वाताहत झाली आहे. ज्या भागात काँग्रेसची अखेरची धुकधुक शिल्लक होती, त्या मतदारसंघातही बंडखोरीला सामोरे जावे लागत आहे. प्रत्येक स्थानिक नेता आपापल्या परीने राजकारण करत असल्याने या निवडणुकीनंतर काँग्रेसचे अस्तित्व काय राहणार, याबद्दल चर्चा झडू लागल्या आहेत. महाड संघवगळता इतर मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार निवडणूक जिंकण्यासाठी नव्हे तर शेकाप, राष्ट्रवादी, शिवसेनेच्या उमेदवारांना जिंकून देण्यासाठी निवडणूक रिंगणात उतरल्याचे प्रत्यक्ष मतदारांचे म्हणणे आहे. 

रायगड जिल्ह्यात सात विधानसभा मतदारसंघ आहेत. आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस मित्रपक्ष आहेत; मात्र श्रीवर्धन मतदारसंघात आघाडीच्या उमेदवार आदिती तटकरे यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या बंडखोरांनी केले आहेत. काँग्रेसचे उपाध्यक्ष ज्ञानदेव पवार, काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष दानिश लांबे, म्हसळा काँग्रेस अध्यक्ष मुईज शेख यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवत बंडखोरी केली. उमेदवारी अर्ज मागे न घेतल्याने काँग्रेस - राष्ट्रवादीच्या मतांची विभागणी होईल, त्यातच मुस्लिम मतांत मोठ्या प्रमाणात विभागणी होण्याची शक्‍यता आहे. 

पेणमध्ये प्रभाव कमी
पेणमध्येही काँग्रेस एकेकाळी सत्ताधारी होता. माजी राज्यमंत्री रवी पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसचा जोर कमी झाला होता. पेणमध्ये नंदा म्हात्रे काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार आहेत. त्यांच्या उमेदवारीने काँग्रेसची पारंपरिक मते माजी राज्यमंत्री रवी पाटील यांना मिळू नयेत, असा प्रयत्न काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा आहे. काँग्रेसचे या मतदारसंघात मोठ्या प्रमाणात मतदार आहेत. पनवेल मतदारसंघातील काँग्रेसची स्थिती खूपच बिकट आहे. ठाकूर पिता-पुत्राने भाजपमध्ये येण्याचा निर्णय घेतला. त्याच वेळी येथील काँग्रेसला घरघर लागली होती. 

ठाकूर कुटुंबीयांमध्येच अलिबागमध्ये वाद 
अलिबाग-मुरूड मतदारसंघात उमेदवारीवरून ठाकूर कुटुंबीयांमध्येच मोठा वाद होता. एकाच कुटुंबातील तीन जण तयार होते. अखेर काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार ॲड. श्रद्धा ठाकूर यांना पक्षश्रेष्ठींनी अचानक उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे अनेक दिवसांपासून निवडणुकीची तयारी करीत असलेले माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे पुत्र राजेंद्र ठाकूर नाराज झाले होते. स्थानिक कार्यकर्त्यांचे राजेंद्र ठाकूर यांना पाठबळ आहे, असे मधुकर ठाकूर यांचे म्हणणे आहे. या दोन्ही उमेदवारीचा परिणाम शिवसेनेचे उमेदवार महेंद्र दळवी यांच्या मतविभाजनावर होण्याची शक्‍यता आहे. याचा अप्रत्यक्ष फायदा शेकापच्या उमेदवाराला होणार आहे. मात्र या राजकीय खेळीने काँग्रेस पक्षावरील अनेक वर्षांचा विश्वास ढासळत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Earthquake : सलग तिसऱ्या दिवशी नागपूरमध्ये भूकंपाचे धक्के; 'या' परिसरात हादऱ्यांची नोंद

Amethi Congress Office: अमेठीत राडा, काँग्रेस कार्यालयाबाहेरील अनेक वाहनांची तोडफोड; भाजपवर आरोप

IPL 2024 Virat Kohli : सुनील गावसकरांचा संताप;स्ट्राईक रेटवरील कोहलीच्या प्रतिउत्तराचे पडसाद

उजनी धरणाने गाठला तळ! सोलापूर शहरासाठी उजनीतून शुक्रवारी सुटणार शेवटचे आवर्तन; भीमा नदी काठावरील वीज राहणार बंद; महापालिकेकडून धरणावर तिबार पंपिंग

Poonch Attack 2024: पुंछ हल्ल्यामागे पाकिस्तानची संघटनेचा हात, तीन ते चार दहशतवाद्यांनी...

SCROLL FOR NEXT