मतदानाचा टक्‍का वाढविण्‍यासाठी येथे प्रशासनाच्‍या वतीने रांगोळी रेखाटण्‍यात आली आहे.
मतदानाचा टक्‍का वाढविण्‍यासाठी येथे प्रशासनाच्‍या वतीने रांगोळी रेखाटण्‍यात आली आहे. 
मुंबई

पेणमध्‍ये रांगोळी स्पर्धेतून मतदारांत जागृती

सकाळ वृत्तसेवा

पेण : भारत निवडणूक आयोगाने देशातील प्रत्येक नागरिकाने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे या उद्देशाने जनजागृतीपर विविध उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. हे उपक्रम राबवण्यासाठी प्रांताधिकारी प्रतिमा पुदलवाड, तहसीलदार अरुणा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून पेण विधानसभा मतदारसंघात सरकारच्या वतीने स्विप कमिटीच्या सदस्या शीतल माळी, रश्‍मी झेमसे यांच्या परीक्षणाखाली रांगोळी स्पर्धेचे आयोजन केले होते.

रांगोळी स्पर्धेतून ‘तुमचे मत, तुमचा अधिकार’, ‘सुजाण नागरिक, संपन्न लोकशाही’, ‘राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’ यांसह विविध प्रकारचे संदेश देऊन रांगोळ्या काढून मतदानाची जनजागृती केली. या स्पर्धेतून फक्त मतदानाचेच नाही, तर प्लास्टिक बंदी आणि पाण्याची बचत याबाबत संदेश देण्यात आले. या स्पर्धेत स्थानिक महिलांसह, महिला बचत गटांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता.

मतदानापासून कोणीही वंचित न राहता, मागे न पडता त्यांनी पुढे यायला पाहिजे तसेच मतदान करून आपली लोकशाही बळकट करावी यासाठी सर्वांनी मतदानाचा हक्क बाजावावा या उद्देशाने आम्ही विविध प्रकारचे संदेश देण्यासाठी स्पर्धेत भाग घेतला असल्याचे स्पर्धक संगीता म्हात्रे आणि पूजा कोळी यांनी  या वेळी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Virat Kohli RCB vs CSK : मी एप्रिलमध्येच बॅग पॅक केली होती.... विराटला स्वतःच्या संघावर विश्वास नव्हता?

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT