खालापूर : चोरी आणि घरफोडींच्‍या गुन्‍ह्यात जप्‍त करण्‍यात आलेला मुद्देमाल दाखविताना पोलिस अधिकारी.
खालापूर : चोरी आणि घरफोडींच्‍या गुन्‍ह्यात जप्‍त करण्‍यात आलेला मुद्देमाल दाखविताना पोलिस अधिकारी. 
मुंबई

घरफोडी, चोऱ्या करणाऱ्या चौकडीला अटक

सकाळ वृत्तसेवा

खालापूर : खालापूर तालुक्‍यात घरफोडी आणि चोऱ्या करून धुमाकूळ घालणाऱ्या चौकडीच्या मुसक्‍या आवळण्यात खोपोली पोलिसांना यश आले आहे. या टोळीकडून सोने-चांदीचे दागिने व इतर असा २ लाख ७० हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. 

खोपोली शहर व परिसरात; तसेच मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर फूड मॉल परिसरात काही दिवसांपासून दिवसा घरफोड्या आणि रात्रीच्या वेळेस चोरीचे प्रमाण वाढले होते. पोलिस अधीक्षक अनिल पारस्कर, अप्पर पोलिस अधीक्षक सचिन गुंजाळ यांच्या आदेशानुसार खोपोली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप-निरीक्षक अमोल वळसंग व पोलिस पथकांनी गुन्हा घडलेल्या ठिकाणी सीसी टीव्ही फुटेज सकंलित केले.

या सीसी टीव्ही फुटेजच्या आधारे हर्षद ऊर्फ पक्‍या गुलाब पवार (वय २६ वर्षे, सध्या रा. फ्लॅट नं १०८,मातोश्री सदन, वाटेकर स्कूलजवळ, मुंब्रा-दिवा, ठाणे), विकास सुनील घोडके (वय २३ वर्षे) यांना ताब्यात घेतले; तर रवी जगन वाघे (रा. पौध आदीवासीवाडी, ता. खालापूर, जि. रायगड), संतोष मारुती पवार (रा. विणेगाव दांडवाडी, ता. खालापूर) यांना अटक केली. चौघांची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. यातील हर्षद ऊर्फ पक्‍या गुलाब पवार, विकास सुनील घोडके या दोघांवर पुणे, ठाणे, बारामती, सोलापूर येथे ४० ते ४५ चोरी व घरफोडीचे गुन्हे दाखल केल्याचे निष्पन्न झाले. 

या आरोपींना पकडण्यासाठी राज्यातील पोलिस कसोशीने प्रयत्न करत असताना पुणे पोलिसांना त्यात यश आले होते. खोपोली पोलिसांनी त्यांचा ताबा घेऊन चौकशी केली असता हर्षद आणि विकास यांनी घरफोडीची कबुली दिली. तसेच चोरीचा सोने-चांदीच्या दागिन्यांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: विराटच्या सुरुवातीच्या तुफानानंतर बेंगळुरूत पावसाचं आगमन, सामना थांबला

Virat Kohli RCB vs CSK : मी एप्रिलमध्येच बॅग पॅक केली होती.... विराटला स्वतःच्या संघावर विश्वास नव्हता?

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT