संग्रहित
संग्रहित  
मुंबई

पेब, बाणकोट किल्ल्यातील थर्टीफर्स्ट महागात

सकाळ वृत्तसेवा

नेरळ/श्रीवर्धन : पेब आणि बाणकोट किल्ल्यातील थर्टीफर्स्ट पर्यटकांना चांगलीच महागात पडली आहे. माथेरानमधील पेब किल्यात मुंबईतील पर्यटक मद्यपान व नशेच्या वस्तू घेऊन झिंगण्याच्या स्थितीत असताना शिवभक्तांनी त्यांना कपडे काढून चोप दिला आहे. तर बाणकोट (बावनकोट) किल्ल्यात मद्यपान करणाऱ्या कामगारांना दुर्गसेवकांनी चोप देऊन समज दिली. 

मुंबईतील 11 पर्यटकांनी दारू, गांजा, अन्य नशेच्या वस्तूंसह माथेरानमधील पेब किल्ला गाठला. या घटनेची माहिती मिळताच पेब किल्ल्यावर काही शिवभक्त पोहोचले. 
त्यांनी मद्यपान व नशेच्या वस्तू घेऊन झिंगण्याच्या स्थितीत असलेल्या पर्यटकांना शुद्धीत आणले. त्यांनी केलेल्या चुकीची जाणीव त्यांना करून दिली. त्यानंतर त्यांना कपडे काढून चोप देत पिटाळून लावले. या घटनेची नोंद नेरळ पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. 

बाणकोट (बावनकोट) किल्ल्यावर 31 डिसेंबरला कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य श्रीवर्धन विभागाचे दुर्गसेवक गस्त घालत होते. त्यावेळी त्यांना खासगी कंपनीचे कामगार दारू पिऊन गडावर धिंगाणा घालत असल्याचे दिसले. त्यावेळेस दुर्गसेवकांनी त्यांना समजावले. मात्र कामगारांनी दारूच्या नशेमध्ये दुर्गसेवकांना शिवीगाळ करीत मारहाण सुरू केली. त्यानंतर समजावण्याचा प्रयत्न करूनसुद्धा न ऐकल्याने दुर्गसेवकांनी कामगारांना चांगलाच चोप दिला. या घटनेची माहिती बाणकोट किल्ल्याजवळील किल्ले वाडी इथल्या ग्रामस्थांना कळली. किल्ले वाडीतील अध्यक्षांनी व दुर्गसेवकांनी त्या कामगारांकडून माफी मागून घेतली. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Swati Maliwal Assault Case: केजरीवालांच्या पीएला ५ दिवसांची पोलीस कोठडी, न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला

J-K Terrorist Attacks: जम्मू-काश्मीरमध्ये दोन दहशतवादी हल्ले, अनंतनागमध्ये पर्यटक जोडप्यावर गोळीबार, भाजप नेत्याची हत्या

IPL 2024 Playoffs Schedule : प्लेऑफचे शेड्यूल! कुठे अन् कधी कोणत्या संघांमध्ये होणार क्वालिफायर आणि एलिमिनेटर सामने?

IPL 2024, RCB vs CSK: चेन्नईचा 17 व्या हंगामातील प्रवास थांबला! धोनीचीही कारकिर्द संपली? सामन्यानंतरचा पाहा Video

Loksabha Election 2024 : हुश्श..! प्रचार संपला, राज्यात तोफा शांत, तलवारी म्यान

SCROLL FOR NEXT