railway TC ready with UPI QR code payment ticket checking mumbai
railway TC ready with UPI QR code payment ticket checking mumbai sakal
मुंबई

Mumbai : तिकीट चेकिंग साठी युपीआय/ क्युआर कोड पेमेंटसह टीसी सज्ज!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : मध्य रेल्वेने पारदर्शक तिकीट चेकिंग साठी तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना बॉडी कॅमेऱ्यांसह युपीआय/ क्युआर कोड पेमेंट सिस्टम उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे प्रवासी आणि टीसी यांच्यात होणारे वाद रेकॉर्ड होणार आहे. याशिवाय टीसींना फुकट्या प्रवाशांकडून दंडाची रक्कम ऑनलाईंन स्वीकार करता येणार आहे.

लोकल,मेल-एक्सप्रेसने प्रवास करताना अनेकदा प्रवासी विनातिकिट प्रवास करतात,सेकण्ड क्लासच्या पासवर फस्ट क्लास,एसी लोकलमध्ये चढतात,अशा प्रवाशांवर टीसीद्वारे दंडात्मक कारवाई करण्यात येते. परंतु अनेकदा या कारवाईदरम्यान प्रवासी टीसीशी वाद,हुज्जत घालतात. बऱ्याचदा या वादावादीचे रुपांतर मोठ्या भांडणात होते.

कधी-कधी रागात प्रवासी टीसीला मारहाण देखील करतात. अशा घटनांना आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेने तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना बॉडी कॅमेऱ्या देण्यात आलेला आहे. या बॉडी कॅमेरे तिकीट तपासणी दरम्यान पारदर्शकता राखण्यास आणि गैरवर्तन आणि हिंसक कृत्ये रोखण्यास मदत होणार आहे.

याशिवाय तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना युपीआय/ क्युआर कोड पेमेंट सिस्टम उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे तिकीट तपासणी कर्मचाऱ्यांना फुकट्या प्रवाशांकडून दंडाची रक्कम घेण्यास मदत करणार आहे. विशेष म्हणजे फुकट्या प्रवाशांना रोख रक्कम नसल्याचे कारण आता टीसीला देता येणार नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Avinash Bhosale: पुण्यातील उद्योजक अविनाश भोसलेंना दिलासा! अखेर जामीन मंजूर

Gujarat News : 'तिला' डॉक्टर व्हायचं होतं, बोर्डाच्या परीक्षेत ९९ टक्के मिळाले; पण दुर्दैव...

EPFO Latest News : PF अकाउंटमधून तीन दिवसात मिळणार एक लाख रुपये, करा फक्त 'हे' काम

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 73,917 आणि निफ्टी 22,465 अंकांवर, कोणते शेअर्स वधारले?

Yed Lagla Premach: 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत 'या' अभिनेत्याची एन्ट्री; दिसणार इन्सपेक्टर जय घोरपडेच्या भूमिकेत

SCROLL FOR NEXT