चिखलावरील भातशेतीची पेरणी.
चिखलावरील भातशेतीची पेरणी.  
मुंबई

पावसाच्या पुनरागमनाने भातशेतीच्या कामाला वेग

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : बाेर्डी परिसरात सोमवारी (ता. २९) जोरदार वाऱ्यासह पावसाचे पुनरागमन झाले आहे. मागच्या आठवड्यात नऊ दिवसांपूर्वी शनिवारी (ता. २०) पावसाने बऱ्यापैकी हजेरी लावली होती. मात्र, रविवार (ता. २१)नंतर पावसाने काढता पाय घेतला होता. शेतीची कामेही खोळंबली होती. मात्र, सोमवारी (ता. २९) पावसाने पुन्हा एकदा जोर धरल्याने शेतीच्या कामाला वेग आला आहे. 
परिसरात २९ जुलैपर्यंत फक्त ८८८ मि.मी. इतका पाऊस झाला असून, मागच्या वर्षीच्या तुलनेत तो ५०० मिलिमीटर कमी आहे. अद्यापही या भागात पावसाची गरज आहे, असे शेतकऱ्यांचे मत आहे. 
बोर्डी परिसरात मागील आठवड्यात पाऊस थांबल्यानंतर हवामानामध्ये मोठ्या प्रमाणात उष्णता निर्माण झाली होती. चालू खरीप हंगामात कमी पाऊस, भातरोपांचा तुटवडा व मोकाट गुरांचा उपद्रव यामुळे या भागातील सुमारे ४० टक्के भातशेती ओसाड राहील, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. 
येथे भातशेतीसोबतच बांधावरील भाजीपाला पीक घेण्याची पद्धत आहे. दुधी पडवळ, चवळी, दोडका अशी पिके घेऊन उदरनिर्वाह करणारी अनेक आदिवासी कुटुंबे आहेत. नियमित पाऊस झाल्यास उत्तम प्रकारचा भाजीपाला उत्पादित होईल, असा विश्‍वास येथील शेतकरी व्यक्त करीत आहेत. चालू वर्षी अनियमित पावसामुळे भातबियाण्यांची उगवण चांगली न झाल्याने रोपांचा तुटवडा भासत आहे. अनेक शेतकऱ्यांनी चिखलणी करून भातपेरणीचा प्रयोग केला आहे. 

बागायतदार भयग्रस्त 
दरम्यान, रविवारी (ता. २८) संध्याकाळपासून वेगवान वारे सुटल्याने, तसेच सोमवारी (ता. २९) सकाळपासून पावसासह वेगवान वारे वाहत असल्याने चिकू बागायतदारांचे धाबे दणाणले आहे. ऑगस्टमध्ये विक्रीसाठी तयार होणारा चिकू वाऱ्याने पडू लागला आहे. या वर्षी चिकूचे उत्पादन दर वर्षीच्या तुलनेत घटले आहे. ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यात काही प्रमाणात फळे मिळाल्यास वर्षभरातला तोटा भरून निघेल, या आशेने बागायतदार बागायतीची मशागत करत आहेत; मात्र दोन दिवस सुटलेला वारा अपेक्षाभंग करेल काय, या भीतीने शेतकरी ग्रासला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT