मुंबई

आलोक नाथ यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल

वृत्तसंस्था

मुंबई- संस्कारी बाबू म्हणून ओळख असलेले अभिनेते आलोक नाथ यांच्यावर अखेर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आलोकनाथ यांच्याविरोधात लेखिका विनता नंदा यांनी एक लेखी तक्रारपत्र ओशिवरा पोलिसांना दिले होते. 

या पत्रात, 19 वर्षांपूर्वी आलोकनाथ यांनी बलात्कार केल्याचा आरोप विनता नंदा यांनी केला होता. याप्रकरणी मंगळवारी (20 नोव्हेंबर) ओशिवरा पोलिसांनी त्यांच्याविरोधात दखलपात्र गुन्ह्याची नोंद केली. मात्र अद्यापपर्यंत त्यांना अटक करण्यात आलेली नाही. 

त्यावेळी तक्रारीची शाहनिशा केल्यानंतरच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे ओशिवरा पोलिसांकडून सांगण्यात आले होते. अखेर मंगळवारी दुपारी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. जबरदस्ती आणि अनैसर्गिक संभोग केल्याप्रकरणी 376(1) आणि 177 या कलमानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने नाना पाटेकर यांच्या विरोधात केलेल्या आरोपांनंतर बॉलिवूडसह कॉर्पोरेट जगतातही "मी टू' मोहिमेमुळे खळबळ उडाली होती. तसेच, काही दिवसांपूर्वी लेखिका विनता यांनी फेसबुकवर पोस्ट अपलोड केली होती. त्यांनी आलोकनाथ यांच्या विरोधात बलात्काराचा आरोप केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT