Narendra Modi
Narendra Modi 
मुंबई

बलात्कार प्रकरणातील फाशीचा मोदींचा दावा चुकीचा

सकाळवृत्तसेवा

मुंबई - भारतामध्ये बलात्काराच्या घटना पूर्वीपासून घडत आहेत. मात्र भाजप सरकार सत्तेवर आल्यानंतर बलात्कार करणाऱ्या आरोपीस तीन, सात, ११ किंवा ३० दिवसांमध्ये फाशी देण्यात येते, असे वक्‍तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच सुरतमध्ये केले होते. एएनआयने याबबचे ट्विट केले होते. तर भाजपच्या अधिकृत ट्विटर हॅन्डलवरूही याबाबतचे ट्विट करण्यात आले होते; मात्र मोदी यांनी बलात्कार करणाऱ्यांना फाशी देण्याबाबतचा आणि बलात्कार पीडितांना सरकार दिलासा देत असल्याचा केलेला दावा अतिशय चुकीचा आहे.

गेल्या तब्बल १५ वर्षांपासून बलात्कार प्रकरणात दोषी आढळलेल्या एकाही आरोपीस फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी करण्यात आलेली नाही. २००४ मध्ये धनंजय चटर्जी यास बलात्काराच्या आरोपातून फाशी देण्यात आली होती. २०१८ मध्ये १२ वर्षांखालील मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नऊ लोकांना फाशीची शिक्षा सुनावली होती. तसेच इतर ५८ जणांना सत्र न्यायालयांनी मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली होती. राष्ट्रीय कायदा विद्यापीठामध्ये प्रसिद्ध झालेल्या २०१८च्या अहवालानुसार लैंगिक अत्याचारप्रकरणी गुन्हा सिद्ध होण्याचे प्रमाण अजूनही २५.५ टक्‍केच आहे. २०१३ मध्ये हे प्रमाण २७.१ टक्‍के होते.

राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्युरोने जाहीर केलेल्या अहवालानुसार २०१६ मध्ये ३८ हजार ९४७ बलात्काराच्या घटना (प्रतिदिन १०७) नोंदवण्यात आल्या. मागील तीन वर्षांमध्ये चार बलात्काराच्या घटनांपैकी केवळ एकच आरोपी दोषी ठरत असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे नरेंद्र मोदी यांनी बलात्कार करणाऱ्या आरोपीस तीन, सात, ११ किंवा ३० दिवसांमध्ये फाशी देण्यात येते हे केलेले वक्‍तव्य चुकीचे ठरते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT