मुंबई

उल्हासनगर : पैशांचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

दिनेश गोगी

उल्हासनगर : उल्हासनगरात राहणाऱ्या व मंत्रालयात काम करणाऱ्या एका अधिकाऱ्याच्या मुलाने अल्पवयीन विद्यार्थिनीला पैशाचे आमिष दाखवून तिच्यावर गोव्यात बलात्कार केल्याचा संतापजनक प्रकार घडला. मोबाईलच्या लोकेशनवरुन गोवा गाठणाऱ्या विठ्ठलवाडी पोलिसांनी या वासनांध मुलाच्या मुसक्या आवळल्या आहेत.

वडील मंत्रालयात कामाला असल्याने पैशांच्या जोरावर उल्हासनगर कॅम्प 4 येथील लालचक्की परिसरात राहणारा विवेक आव्हाड हा महाराष्ट्र शासन अशी पाटी लावलेली चारचाकी घेऊन फिरतो. अल्पवयीन मुलींना पैशाचं आमिष दाखवून फिरायला घेऊन जातो. त्यांना गोव्याच्या पंचतारांकित हॉटेलमध्ये नेतो. ही एखाद्या चित्रपटाची कहाणी नसून असा प्रकार उल्हासनगरात घडत आहे.

तीन दिवसांपूर्वी विवेक आव्हाड आणि त्याच्या मित्राने पैशाचं आमिष दाखवून दोन मुलींना गोव्याला फिरायला नेले आणि त्यापैकी अल्पवयीन मुलीवर हॉटेलमध्ये बलात्कार केला. 
अत्याचारित मुलीच्या कुटुंबीयांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाणे गाठत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश भामे यांची भेट घेतली. हा सर्व प्रकार ऐकूण थक्क झालेले भामे यांनी पोलिस उपायुक्त प्रमोद शेवाळे,सहाय्यक पोलिस आयुक्त डी.डी.टेले यांच्या मार्गदर्शनाखली मोबाईल लोकेशनद्वारे तपासाची चक्रे फिरवली.

विवेक आव्हाड हा गोव्यात असल्याचे लोकेशनवरुन स्पष्ट होताच पोलिस उपनिरीक्षक सचिन साळवे,पोलिस नाईक राहुल काळे,रोहिदास बुधवंत, पांडुरंग पतवे, विकास सोलसे, रविकांत गांगुरुडे यांनी गोव्यातून विवेकच्या मुसक्या आवळून त्याला उल्हासनगरात आणून अल्पवयीन विद्यार्थीनीची सुटका केली.

विवेकला पॉक्सोअंतर्गत अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर यापूर्वीदेखील गुन्हा दाखल असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक रमेश भामे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Hatkanangale: निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या राजू शेट्टींना चित्रपटात काम करावसं का वाटलं? जाणून घ्या

Gulabrao Patil: भाजपवाल्यांनी काम केलं नाही तर आम्ही... गुलाबराव पाटलांच्या वक्तव्यामुळे BJP कार्यकर्त्यांमधे संभ्रम

Bajrang Punia Suspended : बजरंग पुनियाचे स्वप्न भंगले... डोपिंग टेस्ट न केल्याने निलंबित

Summer Fashion Tips : उन्हाळ्यात कूल आणि स्टायलिश दिसायचंय? मग, अशा प्रकारच्या कलर पॅटर्न्सची करा निवड

Raju Shetti in Hatkanangale: 'राजकारणात यायचं म्हणजे गेंड्याची कातडी लागते'; राजकारण की चळवळ, राजू शेट्टींची कशाला पसंती?

SCROLL FOR NEXT