Sakal Young inspiration network
Sakal Young inspiration network sakal media
मुंबई

‘यिन’च्या अधिवेशनात रेशनिंगचा मुद्दा गाजला; पहिल्यांदाच कामकाज तहकूब

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : 'सकाळ माध्यम समूहा’चे (sakal media group) ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन) (Young inspiration network) तर्फे आयोजित शॅडो कॅबिनेट मंत्रिमंडळाचे विशेष अधिवेशन गुरुपासून (ता. २४) मुंबई येथील यशवंतराव चव्हाण सभागृहात सुरू झाले. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यातील रेशनिंग व्यवस्थेच्या (Rationing issue) मुद्द्यावर अधिवेशन गाजले. मुख्यमंत्री पार्थ देसाई (Parth Desai) यांनी दिलेले उत्तर समाधानकारक नसल्याचा दावा करत विरोधकांनी घोषणाबाजी केली. यामुळे ‘यिन’ मंत्रिमंडळाच्या इतिहासात पहिल्यांदाच सभागृहाचे कामकाज दहा मिनिटे तहकूब करण्याची घोषणा सभापती गायत्री उरकुडे (Gayatri urkude) यांनी केली.

मुख्यमंत्री पार्थ देसाई यांनी राज्यातील रेशनिंग व्यवस्थेसंदर्भात ठराव मांडला होता. त्यावर विरोधी पक्षनेत्या समृद्धी ठाकरे यांनी आक्षेप घेत राज्यात केवळ पाच किलो रेशन दिले जाते, मात्र त्यामध्ये दर्जा नसल्याने हे धान्य गाई-गुरांना दिले जाते. धान्य नागरिकांना मिळाले पाहिजे, अशी मागणी ठाकरे यांनी केली. स्थलांतरित नागरिकांचा सरकारने अजूनही सर्व्हे केला नाही. त्यामुळे सर्वांनाच धान्य दिले जाते. विशेष म्हणजे ज्यांना गरज नाही अशांना सुद्धा पिवळे रेशन कार्ड दिले जाते, ही बाब त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली. त्यावर मुख्यमंत्री देसाई यांनी आपल्या उत्तरात, प्रतिव्यक्ती पाच किलो धान्य मिळते. आमच्या सरकारने अन्नाची चोरी आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला, असे सांगितले.

विरोधी पक्षनेत्या ठाकरे यांनी त्यावर आक्षेप घेत सरकारला गरिबांचे दुःख कळत नाही. त्यांच्या घरी जाऊन जेवून यावे, असे उद्गार काढले. मुख्यमंत्र्यांनी खुलासा करत सरकारला राज्यातील करून गरीब कुटुंबांची परिस्थिती माहीत असल्याचे सांगितले. त्यावर विरोधी पक्ष सदस्य शुभम मिसाळ यांनी जोरदार आक्षेप घेतल्याने सभागृहात दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू झाल्याने सभापती गायत्री उरकुडे यान सभागृहाचे कामकाज १० मिनिटे तहकूब केले. त्यानंतर ‘यिन’चे राज्य व्यवस्थापक श्यामसुंदर माडेवार यांनी सभागृहात ७२ ठराव असून सदस्यांनी एका ठरावावर इतका वेळ घालू नये, अशी समजूत काढली. त्यामुळे पुढील कामकाज सुरू झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT