the rationing officer arrested while taking bribe in Thane
the rationing officer arrested while taking bribe in Thane 
मुंबई

ठाण्यात लाचखोर शिधावाटप अधिकाऱ्याला रंगेहाथ पकडले

सकाळवृत्तसेवा

ठाणे : शिधावाटप दुकानदाराकडून 12 हजाराची लाच स्वीकारणाऱ्या ठाण्यातील शिधावाटप निरीक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी) विभागाच्या पथकाने रंगेहात अटक केली.

वासुदेव श्रीराम पवार (48) असे अटक करण्यात आलेल्या लाचखोर अधिकाऱ्याचे नाव असून तो ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातील शिधावाटप कार्यालयात निरीक्षक पदावर कार्यरत आहे.

एसीबी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेतील तक्रारदार यांचे ठाण्यात शिधावाटप दुकान असून या दुकानासंबंधी शासकीय काम करण्यासाठी पवार याने 12 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी या प्रकरणी ठाणे एसीबी पथकाकडे फिर्याद दाखल केली. त्यानुसार या घटनेची पडताळणी केली असता त्यात संबंधित शिधावाटप निरीक्षक  यांनी लाच मागितल्याचे स्पष्ट झाले.

दरम्यान, या प्रकरणी बुधवारी एसीबी पथकाने सापळा कारवाईचे आयोजन करून वासुदेव श्रीराम पवार यास 12 हजाराची लाच स्वीकारताना जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात रंगेहात अटक केली. त्याच्या विरोधात ठाणेनगर पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

IPL 2024 DC vs RR Live Score: अक्षर पटेलने राजस्थानला दिला दुसरा धक्का! दोन्ही सलामीवीर परतले माघारी

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

Rohit Pawar: रोहित पवारांनी शेअर केलेल्या 'त्या' व्हिडिओनंतर PDCC बँकेच्या मॅनेजरसह बँकेवर गुन्हा दाखल

Latest Marathi News Update : दिवसभरात देश-विदेशात काय घडलं? जाणून घ्या एका क्लीकवर

SCROLL FOR NEXT