अपंग डब्‍यातून गर्भवती महिलांना परवानगी
अपंग डब्‍यातून गर्भवती महिलांना परवानगी 
मुंबई

गर्भवती महिलांना अपंग डब्‍यातून प्रवास करण्‍यासाठी रेल्वेकडून दिलासा

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : गर्भवती महिलांना दिव्यांगांच्या डब्यात प्रवास करण्यास रेल्वेने परवानगी दिली आहे. मनसे प्रमुख राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरे यांनी ९ जुलैला रेल्वेच्या समस्यांबद्दल चर्चा करण्यासाठी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतली होती. यावेळी गर्भवती महिलांना रेल्वेतून प्रवास करताना दिव्यांगांच्या डब्यातून प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली होती. त्यानंतर आता रेल्वेने परवानगी दिल्यामुळे गर्भवती महिलांना दिलासा मिळाला आहे. 

अमित ठाकरे यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतली होती. त्यावेळी येत्या तीन महिन्यात उपनगरी रेल्वेचे प्रश्न सोडविले नाहीत तर मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला होता. त्यावेळी गाड्यांची अनियमिततेपासून ते गाड्या अचानक रद्द होणे, फलाटांवरची अस्वच्छता ते महिला प्रवाशांची सुरक्षितता अशा अनेक विषयांवर रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून मनसेच्या वतीने मागण्याचे एक निवेदन रेल्वेला देण्यात आले होते. त्यावेळी महिलांच्या सुरक्षेसाठी सीसी टीव्ही लावण्यात यावे आणि सुरक्षा रक्षकांच्या संख्येतही वाढ करण्यात यावी, त्याचबरोबर गर्भवती महिलांना दिव्यांगांच्या डब्यात प्रवास करण्याच्या मागणीला आता रेल्वेने परवानगी दिली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar: "अरे मामा जरा जपून... तुझं सर्व काढायला वेळ लागणार नाही"; इंदापुरात शरद पवारांचा इशारा!

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : अर्शदीपचा अप्रतिम यॉर्कर अन् रहाणे झाला बाद

Lok Sabha : 'एक भाकरी, एक रूपया द्या.. एका भिक्षुकाला पंतप्रधान करा' म्हणणाऱ्या विजयप्रकाश कोंडेकरांकडे किती आहे संपत्ती?

Latest Marathi News Live Update : राहुल गांधी यांनी वायनाडच्या लोकांशी केलेली फसवणूक - गौरव वल्लभ

South India Travel : उन्हाळ्यातही करू शकता दक्षिण भारताची सफर; जाणून घ्या 'ही' थंड हवेची ठिकाणं

SCROLL FOR NEXT